ETV Bharat / state

भयाण वास्तव ! अंगाला हळद लावलेल्या अवस्थेत नवरी मुलीची पाण्यासाठी भटकंती

चक्क अंगाला हळद लावलेल्या नवरी मुलीला पाण्यासाठी विहिरीवर जावे लागत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

भयाण वास्तव ! अंगाला हळद लागलेल्या अवस्थेत नवरी मुलीची पाण्यासाठी भटकंती
author img

By

Published : Apr 15, 2019, 9:29 PM IST

Updated : Apr 15, 2019, 11:49 PM IST

ठाणे - मुरबाड तालुक्यात पाणी टंचाई दूर करण्यासाठी सरकारने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र, पाण्यासाठी महिलांची भटकंती आजही सुरूच आहे. धसई गावाजवळ कळंबाड ग्रामपंचायत अंतर्गत येणारी दुर्गापूर ही आदिवासी समाजाची वस्ती आहे. या वस्तीत पाण्यासाठी चक्क अंगाला हळद लागलेल्या नवरी मुलीला विहिरीवर जावे लागत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

नवरी मुलगी अरुणा वाघ बोलताना

अरुणा तानाजी वाघ असे पाण्यासाठी भटकंती करत असलेल्या नवरी मुलीचे नाव आहे. आज तिची हळद असल्याने सायंकाळी तिच्या घरी पाहुणे मंडळी येणार होती. तेव्हा त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी तिनेच चक्क डोक्यावर हंडा घेत, तळ गाठलेल्या विहिरीवर पाण्यासाठी धाव घेतली. मात्र, त्याही विहिरीने तळ गाठल्याने, तिला दोन हंडे पाणी भरण्यासाठी किमान १ तासभर वेळ लागला.

आज अरुणाची हळद आहे. तर उद्या (मंगळवारी) तिचा शहापूर तालुक्यातील टाकीपठार येथील रहिवासी याच्याशी लग्न सोहळा पार पडणार आहे. तरी तिला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यावरून आपण अंदाज लावू शकता की, या भागात पाणीटंचाईमुळे किती त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मागील २ वर्षांपासून या परिसरातील गावांना उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही. चक्क एका नवरी मुलीला आपल्या लग्नाच्या हळदी दिवशीच पाणी भरण्यासाठी विहिरीवर जावे लागते. यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नसल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

मुरबाड तालुक्यात भीषण पाणीटंचाई असून मार्च महिना संपत आला तरी शासनाचे टँकरने पाणी पुरवठा सुरू केला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी 'आधी पाणी द्या, मग मत मागा' असा पावित्रा घेतला आहे. एकंदरीतच आदिवासी पाडे, वस्तीमध्ये पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यात शासनाला अपयश आल्याचे दिसून येत आहे.

(विशेष )
 भयाण वास्तव ! अंगाला हळद लागलेल्या अवस्थेत नवरी मुलीची पाण्यासाठी भटकंती

ठाणे :- मुरबाड तालुक्यात पाणी टंचाई दूर करण्यासाठी सरकारने आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. विशेषतः देशातील एकमेव कॅशलेस गावात व आजूबाजूच्या गाव, पाड्यात पाणीपुरवठा योजनेवर लाखोंचा निधी दिला आहे. मात्र तरीही महिलांची पाण्यासाठी भटकंती आजही सुरूच आहे. याच धसई गावाजवळच कळंबाड ग्रामपंचायत अंतर्गत दुर्गापूर या आदिवासी समाजाच्या वस्तीमध्ये पाण्यासाठी चक्क अंगाला हळद लागलेल्या अवस्थेत नवरी मुलगी तब्बल ४ तास पाणी भरायला तळ गाठलेल्या विहिरीवर ताटकळत राहावं लागत असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.

अरुणा तानाजी वाघ  असे पाण्यासाठी भटकंती करीत असलेल्या नवरी मुलीचे नाव आहे. आज तिची हळद असल्याने सायंकाळी घरी पाहुणेमंडळी येणार त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी तिनेच चक्क डोक्यावर हंडा घेत, तळ गाठलेल्या विहिरीवर पाण्यासाठी धाव घेतली. मात्र त्याही विहिरीने तळ गाठल्याने तिच्या पोहऱ्या गिलास भर पाणीच यायचे, त्यामुळे तिला दोन हंडे भरण्यासाठी किमान एक तासभर लागत होता. आज अरुणाची हळद आहे. तर उद्या (मंगळवारी) तिचा शहापूर तालुक्यातील टाकीपठार येथील नवरदेवासोबत लग्न सोहळापार पडणारा आहे. यावरून आपण अंदाज लावू शकता कि, या भागात पाणीटंचाईने किती हाहाकार उडाला आहे. तर पंचक्रोशीतील गावांना दोन वर्षापासून उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सदर गावामध्ये इतकी भीषण पाणीटंचाई असतांना प्रशासनाकडून  टँकरने पाणीपुरवठा ही केला जात नाही हे दुर्दैव आहे. चक्क आपल्या लग्नाच्या हळद दिवशीच नावरीमुलीला पाणी भराव लागत यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नसल्याची प्रतिक्रिया नरेश पडावले यांनी दिली आहे.

दरम्यान, मुरबाड तालुक्यात पाणीटंचाई ही आदिवासीच्या पाचवीलाच पुजली असल्याने मुरबाडमधील अनेकगाव- पाड्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शासनाचे टँकर मार्च महिना संपत आला तरी ते आपल्यापर्यंत पोहचले नसल्याने मते मागायला येणार्‍या नेत्यांना आधी पाणी द्या मग मत मागा अशी विचारणा मतदार करत आहेत. एकंदरीतच आदीवासी पाड्या, वस्तीमध्ये पाणी टंचाईवर उपाय योजना करण्यात शासनाला अपयश आल्याचे दिसून येत आहे.

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
Last Updated : Apr 15, 2019, 11:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.