ETV Bharat / state

Navratri special : आई मुंब्रा देवीचा काय आहे इतिहास? वाचा हा खास रिपोर्ट - Mumbra Devi Temple Information

मुंबई ठाण्याहून कल्याण डोंबिवलीच्या दिशेने लोकलने प्रवास करत असताना मुंब्रा रेल्वे स्थानक येताच नजर जाते, ती लोकलमधून दिसणाऱ्या भल्या मोठ्या डोंगरावर आणि या डोंगरात वसलेल्या आई मुंब्रा देवीच्या मंदिरावर. सह्याद्री किनार पट्टीच्या डोंगराळ भागातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील पुस्तकात उल्लेख असलेल्या आई मुंब्रा देवीचा काय आहे ईतिहास? वाचा हा खास खास रिपोर्ट.

Mumbra Devi History Special Report
मुंब्रा देवी इतिहास खास रिपोर्ट
author img

By

Published : Oct 12, 2021, 10:34 PM IST

ठाणे - मुंबई ठाण्याहून कल्याण डोंबिवलीच्या दिशेने लोकलने प्रवास करत असताना मुंब्रा रेल्वे स्थानक येताच नजर जाते, ती लोकलमधून दिसणाऱ्या भल्या मोठ्या डोंगरावर आणि या डोंगरात वसलेल्या आई मुंब्रा देवीच्या मंदिरावर. सह्याद्री किनार पट्टीच्या डोंगराळ भागातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील पुस्तकात उल्लेख असलेल्या आई मुंब्रा देवीचा काय आहे ईतिहास? आणि कशा प्रकारे साजरा केला जातो या ठिकाणी नवरात्रोत्सव? वाचा हा खास खास रिपोर्ट.

माहिती देताना मुंब्रा देवीचे सेवेकरी आणि भाविक

हेही वाचा - अंबरनाथ एमआयडीसीमधील केमिकल कंपनीत वायू गळती; २८ कामगार बाधित

मुंब्रा देवी मंदिराच्या निर्माणाची ही एक ऐतिहासिक कथा नाही तर, अलीकडचीच वास्तविकता आहे. डोंगर कपारीत असलेल्या या मुंब्रा देवीचे रस्त्यावरून जाणारे, लोकल ट्रेन मधून प्रवास करणारे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेऊनच पुढील प्रवास करत असल्याची एक परंपरा आणि संस्कृती आहे. मुंब्रा देवी मंदिर हे जरी डोंगरात असले तरीही भाविक दर मंगळवारी आणि इतर दिवशीही या ठिकाणी दर्शनासाठी येता असतात.

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पोहोचण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो

मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरल्यावर अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर आणि मुंब्रा बायपासवर अगदी रस्त्यालगत हे मंदिर लागते. या मंदिराला एकूण ७५० पायऱ्या आहेत आणि या खडतर पायऱ्यांचा प्रवास करत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पोहोचण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. मंदिर प्रवेशद्वाराच्या काही पायऱ्या सर केल्यानंतर सर्वात आधी लागते मारुती आणि साती आसरा देवीचे मंदिर. आधी या मंदिरात दर्शन करूनच भाविक पुढील प्रवासाला सुरुवात करतात. मंदिरात जाताना डोंगराच्या मध्यभागी पोहोचताच डोंगरावरून नजरेस पडतो तो संपूर्ण खाडी किनारा व संपूर्ण मुंब्रा, दिवा, डोंबिवली शहराचा परिसर आणि या ठिकाणी पोहोचताच भाविकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही.

मंदिरात नऊ दुर्गांचे होते दर्शन

७५० पायऱ्या चढून वर आल्यानंतर लागतो तो मंदिराचा मुख्य गाभारा आणि गाभाऱ्यात आल्यावर दर्शन होत ते आई मुंब्रा देवीचे. महाराष्ट्रातील असे हे पहिले मंदिर आहे ज्यात नऊ दुर्गांचे दर्शन होते. नवरात्री दरम्यान या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आई मुंब्रा देवीचे मंदिर देखील कोरोनाकाळात गेली दीड वर्षे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते, मात्र नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर राज्य सरकारने जारी केलेल्या कोरोनाच्या अटी व नियम पाळत हे मंदिर इतर मंदिरांप्रमाणे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे, त्यामुळे भाविकांमध्ये आणि मंदिर प्रशासनामध्ये आनंदाच वातावरण आहे.

अनेक दशकांचा इतिहास

मुंब्रा हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. ठाण्याच्या जवळ असलेले हे ठिकाण मुंबईपासून ४० कि.मी. अंतरावर आहे. मुंब्र्यात खाडी असल्याने मोगल काळात कल्याणच्या किल्ल्याची राखण करणारी चौकी म्हणून वसलेल्या या गावात सतराव्या शतकात जहाजबांधणीचा उद्योग भरभराटीस आला. आगरी - कोळी यांची देवता मुंब्रा देवीच्या नावावरून गावाचे नाव मुंब्रा ठेवण्यात आले. मंदिराचे बांधकाम मुंब्रा येथील भगत कुटुंबाने केले असून ते अजूनही शहरातच राहतात. १७ व्या शतकाच्या दरम्यान मुंब्रा हे आगरी - कोळीचे एक लहान गाव होते. त्यांचा मुख्य व्यवसाय हा मच्छिमारी होता. १९६८ ते १९७५ च्या दरम्यान नोकरीसाठी मुंबईला येणाऱ्यांची संख्या वाढू लागली व लोकांनी मुंबईच्या जवळ वसाहत स्थापन करायला सुरुवात केली. त्याच वेळी मुंब्र्याच्या शेतजमिनीचे शहरीकरण झाले व लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली, असा इतिहास मुंब्रा देवीचे सेवेकरी सांगतात.

दीड वर्षानंतर भक्त समाधानी

तब्बल दीड वर्षांनंतर मंदिरांची दारे राज्य सरकारने उघडल्याने भाविकांना मुंब्रा देवीच्या मंदिरात येऊन दर्शन मिळत असल्याने भाविक देखील देवीची मनोभावे पूजा, अर्चा करत समाधान व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - Navratri Special - तृतीयपंथीयांचाही देवीचा जागर १४ वर्षापासून अवरितपणे सुरु

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.