ETV Bharat / state

Hindu-Muslim Girls Football Thane : हिजाब आणि दुपट्टे घालून हिंदू-मुस्लिम मुलींचा फुटबॉलचा सामना - Agitations over hijab issue

देशात सध्या हिजाब प्रकरणावरुन गोंधळ ( Dispute over hijab issue ) सुरु आहे. परंतु मुंब्र्यात हिंदू मुस्लिम ऐकतेचा अनोखा संगम पहायला मिळत आहे. हिंदू आणि मुस्लिम मुलींनी मंगळवारी (१५ फेब्रुवारी) एकत्र येऊन फुटबॉलचा सामन खेळला. कर्नाटकातील हिजाब बंदीचा विरोध करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम मुलींनी हा सामना खेळला.

football
football
author img

By

Published : Feb 16, 2022, 12:24 PM IST

Updated : Feb 16, 2022, 1:57 PM IST

ठाणे - देशात सध्या हिजाब प्रकरणावर ( Hijab case in the country ) उठलेल्या वादळाने थैमान घातलेले असतानाच मुंब्र्यात मात्र हिंदू मुस्लिम ऐकतेचा अनोखा संगम पहायला मिळत आहे. गेली पाच वर्षे इथे हिंदू आणि मुस्लिम मुली एकत्र येऊन फुटबॉलचा सराव करतात. दोन्ही धर्माच्या मुली एकत्र खेळत असल्या तरी आजच्या परिस्थितीचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नसल्याचे पहायला मिळाले. तसेच त्यांनी मंगळवारी बुरखा घालून फुटबॉल सामना खेळला. त्यांना हिंदू मुलिंनीही साथ दिली. हिंदू मुलींनी दुपट्टा डोक्याला गुंडाळून फुटबॉल खेळला. कर्नाटकातील हिजाब बंदीचा निषेध करण्यासाठी हा सामना आयाोजित करण्यात आला होता. त्याचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.

हिंदू-मुस्लिम मुली खेळत असलेल्या फुटबॉल बद्दल माहिती देताना प्रशिक्षक

मुस्लिम मुली परिधान करत असलेल्या हिजाब वरून सध्या देशात गोंधळाची ( Agitations over hijab issue ) परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक राज्यातील उडुपी येथील एका शैक्षणिक संस्थेत हिजाब घालून ( Hijab case at Udupi ) प्रवेश करणाऱ्या एका मुलीला प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण देशातील मुस्लिम समाज चवताळून उठला. देशातील विविध भागात मुस्लिम संघटनांनी एकत्र येत आंदोलन सुरु केले. भाजप विरोधी राजकीय पक्षांच्या हातात आयतेच कोलीत लागल्याने त्यांनी हा संधीचा फायदा घेत आगीत तेल ओतण्याचे काम सुरु केले. देशात ही परिस्थिती असताना हिंदू मुस्लिम संघर्षाच्या नेहमीचं केंद्रस्थानी राहीलेल्या मुंब्र्यात मात्र हिंदू मुस्लिम बंधुत्वाचे अनोखे दर्शन ( Hindu-Muslim brotherhood in Mumbra ) बघायला मिळत आहे.

फुटबॉलचा सामना
फुटबॉलचा सामना
कधीच झाला नाही वाद -

मुंब्र्याच्या आसपासच्या परिसरातील हिंदू आणि मुस्लिम मुली गेली पाच वर्षे एकत्र येत फुटबॉलचा ( Hindu-Muslim girls football match ) सराव करतात. मुस्लिम मुली या हिजाब वापरतात तर हिंदू मुली दुपट्टे बांधून सराव करतांना दिसतात. दोन्ही समाजाच्या मुली एकमेकांच्या रूढी आणि परंपरांचा सम्मान करत असल्याने त्यांच्यात कधीच कोणता वाद झाला नसल्याचे मत प्रशिक्षक सबा शेख यांनी व्यक्त केले. दोन्ही समाजाच्या मुली सणासुदीला एकमेकींच्या घरी जाऊन आनंदात सामील होतात. त्यामुळे त्यांच्यात प्रेमाचे आणि आपले पणाचे नाते प्रस्थापित झाले असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले.

फुटबॉल खेळताना मुली
फुटबॉल खेळताना मुली

भोपाळमध्ये बुरखा घालून क्रिकेट सामना

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मुस्लिम मुलींनी ९ फेब्रुवारी रोजी बुरखा घालून क्रिकेट सामना खेळला होता. कर्नाटकातील हिजाब बंदी विरोध करण्यासाठी हा खेळ खेळण्यात आला होता. भोपाळमधील आमदार आरिफ मसूद यांचे कॉलेज असलेल्या इंदिरा प्रियदर्शिनी कॉलेजमध्ये हा सामना झाला होता. त्यात फुटबॉलही खेळण्यात आला होता. केवळ या मुलींनीच नव्हे तर आरिफ मसूद यांनीही या बंदीचा विरोध केला होता. यावेळी या मुली म्हणाल्या होत्या की हिजाब आणि नकाबमध्ये आम्हाला सुरक्षित वाटते. हिजाब आमचा अधिकार आहे. ही आमची वेगळी ओळख आहे. इतर लोकांना याचा काही त्रास होण्याची शक्यता नाही.

फुटबॉलचा सामना
फुटबॉलचा सामना

कर्नाटकातून सुरु झाला होता वाद

कर्नाटकातील उडुपी येथून हिजाब वाद सुरु झाला होता. जानेवारी महिन्यात येथील कॉलेज आणि शाळांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणानंतर उडुपीतील भंडारकर कॉलेजमध्येही असाच नियम करण्यात आला होता. त्यानंतर शिवमोगा जिल्ह्यातील भद्रवती कॉलेजमध्ये हा नियम करण्यात आला. आता बऱ्याच कॉलेजमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. या प्रकरणी काही विद्यार्थीनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर सुनावणी करण्यात येत आहे.

Last Updated : Feb 16, 2022, 1:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.