ETV Bharat / state

भिवंडीत मुसळधार पावसामुळे अनेक दुकानांसह घरांमध्ये शिरले पाणी - Low lying area rain water Bhiwandi

भारतीय हवामान विभागाने ९ ते १२ जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच, यावर्षीही पावसाची सरासरी ९६ ते १०४ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावून आज पहाटेपासून जोरदार कोसळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, दुपारपासूनच भिवंडी शहरासह ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण होऊन ठिकठिकाणी सखल भाग पाण्याखाली गेले आहे.

rain water enter houses bhiwandi
पूरजन्य परिस्थिती भिवंडी
author img

By

Published : Jun 9, 2021, 5:31 PM IST

ठाणे - भारतीय हवामान विभागाने ९ ते १२ जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच, यावर्षीही पावसाची सरासरी ९६ ते १०४ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावून आज पहाटेपासून जोरदार कोसळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, दुपारपासूनच भिवंडी शहरासह ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण होऊन ठिकठिकाणी सखल भाग पाण्याखाली गेले आहे. अनेक दुकांनासह घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहे. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पाणी साचल्याचे दृश्य

'या' परिसरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल

भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे भिवंडी परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून बहुतांश घरांमध्ये व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली. मात्र, दुपारनंतर पावसाने उशिरापर्यंत उसंत घेतल्याने ठिकठिकाणी सखल भागात साचलेले पाणी ओसरायला लागल्याने नागरिकांना काहीवेळ उसंत मिळाली आहे.

शहरातील काही भागांत वीज पुरवठा खंडित झाला आहे, तर यावर्षी नाले सफाईचा पहिल्याच पावसाने पोलखोल केले आहे. नाले, गटारातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात शिरले आहे. शहरातील निजामपुरा, कणेरी, कमला हॉटेल, नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती, शिवाजी नगर, सिटीजन हॉस्पिटल मेनरोड, शास्त्रीनगर , आनंद हॉटेल मागील नाला, वरालदेवी हॉस्पिटल मेनरोड, भाजीमार्केट, नजराना कंपाऊंड येथील सखल भागातील दुकाने, घरांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे खूपच हाल झाले आहेत.

हेही वाचा - गडकरींचा भाऊ असल्याचे सांगून बाप-लेकाचा सोनाराला 5 लाखाला गंडा

तीनबत्ती येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विक्रेत्यांचा भाजीपाला व अन्य वस्तू देखील वाहून गेले आहेत. तर, भाजीपाला व्यापाऱ्यांनी आपला भाजीपाला वाहत्या पाण्यात टाकून पालायन केले आहे. महानगरपालिका हद्दीतील म्हाडा कॉलनी, इदगाहरोड येथील कामवारी नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे हाल झाले आहेत.

ग्रामीण भागातही पावसाचा जोर, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याणरोड, अंजूरफाटा, रांजणोली बायपास नाका, माणकोली नाका, वंजारपट्टीनाका, नारपोली, नझराना सर्कल, भिवंडी - वाडा रोडवरील नदीनाका अशा विविध मार्गांवरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. तर, ग्रामीण भागातील चिंबीपाडा, कुहे, आंबराई, खडकी परिसरातील वारणा नदीला मिळणारे जंगलातील छोटे - मोठे ओहळ, नाले भरून वाहू लागले आहेत. दुसरीकडे महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी नाले सफाई ठेकेदाराने नालेसफाई व्यवस्थित न केल्यास बिल अदा करणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे, आयुक्त नाले सफाई ठेकदारावर काय कारवाई करणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - weather update पहिल्याच पावसाने रेल्वेची ठाणे-मुंबई सेवा ठप्प

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.