ETV Bharat / state

गुडविन ज्वेलर्सचे कुमार बंधू 'नीरव मोदी' - महेश तपासे

author img

By

Published : Oct 29, 2019, 7:37 PM IST

एकीकडे ऐन दिवाळीत राज्यातून गुडविन ज्वेलर्सच्या कुमार बंधूंनी गाशा गुंडाळून पसार झाल्याने हजारो गुंतवणूकदार आर्थिक कोंडीत सापडले आहे. दुसरीकडे रामनगर पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांनी कुमार बंधूनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.

तपासे यांनी मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेर यांची भेट घेतली.

ठाणे - गुडविन ज्वेलर्सच्या कुमार बंधूनी गाशा गुंडाळून पसार झाल्याने हजारो गुंतवणूकदार आर्थिक कोंडीत सापडले आहेत. म्हणून कुमार बंधू हे डोंबिवलीतील नीरव मोदी आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी येथे केला. तपासे यांनी मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेर यांची भेट घेतली. यावेळी तपासे यांनी गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनील व सुधीश कुमार त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणीही केली. गुंतवणूकदारांनी तपासे यांच्याकडे धाव घेतली असता ते त्यांच्यावतीने पोलीस ठाण्यात आले होते.

गुडविन ज्वेलर्सचे कुमार बंधू 'नीरव मोदी'; राष्ट्रवादीचा आरोप

हेही वाचा - पीएमसी घोटाळा : आरबीआयच्या इमारतीबाहेर खातेधारकांची 'काळी दिवाळी'

एकीकडे ऐन दिवाळीत राज्यातून गुडविन ज्वेलर्सच्या कुमार बंधूंनी गाशा गुंडाळून पसार झाल्याने हजारो गुंतवणूकदार आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुसरीकडे रामनगर पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांनी कुमार बंधूनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. तपासे पुढे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांच्या बाबत बोलायचे झाल्यास भाजप- शिवसेना हे सरकार स्थापनेत गुंतले आहेत. त्यांना सर्वसामान्याच्या जीवनाशी काहीही घेणेदेणे नाही. आज याठिकाणी भाजप-सेनेच्या मोठ्या नेत्यांनी लक्ष दिले पाहिजे होते. मात्र, गुंतवणूकदारांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष उभा आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - महाराष्ट्रात कोणी दुष्यंत नाही ज्याचे वडील तुरुंगात आहेत.. 'शिवसेना सत्तेसाठी भुकेलेली नाही'

गुडविन ज्वेलर्सचे मालक कुमार बंधूंना लुकआउट नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे हे कुमार बंधू परदेशात पळून जाऊ शकत नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांनी सांगितले. ते म्हणाले, गुंतवणूकदारांच्या मंगळवारी दुपारपर्यंत 74 तक्रारी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत सुमारे पावणे चार कोटींची फसवणूक झाली आहे. तर गुडविन ज्वेलर्सच्या मालकाविरोधात ठाणे गुन्हे आर्थिक शाखेत गुन्हा वर्ग करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, डोंबिवलीतील 2 सेवानिवृत्त अधिकारी रामचंद्र शिंत्रे आणि किशोर लांगडे यांनी आपल्या प्रॉव्हिडंट फंडातून मिळलेले लाखो रुपये गुडविन ज्वेलर्स गुंतविले होते. यांची फसवणूक झाल्याने तेही रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते.

Intro:kit 319Body:गुडविन ज्वेलर्सचे कुमार बंधू तर निरव मोदी .. राष्ट्रवादीचा आरोप.

ठाणे :- राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात वपोनी आहेर यांची भेट घेतली. यावेळी तपासे यांनी गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनील व सुधीश कुमार हे डोंबिवलीतील निरव मोदी असून हे भारतातून पळून जावू नये म्हणून पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

एकीकडे एन दिवाळीत राज्यातून गुडविन ज्वेलर्सच्या कुमार बंधूनी गाशा गुंडाळून पसार झाल्याने हजारो गुंतवणूकदार आर्थिक कोंडीत सापडले आहे. दुसरीकडे रामनगर पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांनी कुमार बंधूनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. तपासे पुढे म्हणाले कि, सत्ताधाऱ्यांच्या बाबत बोलायचे झाल्यास ह भाजप- शिवसेना हे सरकार स्थापनेत गुंतले असून त्यांना सर्वसामान्याच्या जीवनाशी काहीही घेणेदेणे नाही. खर तर आज याठिकाणी भाजप- सेनेच्या मोठ्या नेत्यांनी लक्ष दिले पाहिजे होते. परंतु गुंतवणूकदारांच्या पाठशी राष्ट्रवादी आहे. यावेळी गुंतवणूकदारांनी तपासे यांच्याकडे धाव घेतली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांना विचारले असता ते म्हणाले, गुडविन ज्वेलर्सचे मालक कुमार बंधू लुकआउट नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे हे कुमार बंधू परदेशात पळून जाऊ शकत नाही. गुंतवणूकदारांच्या मंगळवार दुपारपर्यत 74 तक्रारी दाखल झाल्या असून आतापर्यत सुमारे पावणे चार कोटींची फसवणूक झाल्याचे रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनी सुरेश आहेर यांनी सांगितले असून गुडविन ज्वेलर्सच्या मालकाविरोधातील गुन्हा ठाणे गुन्हे आर्थिक शाखेत वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान ,डोंबिवलीतील दोन सेवानिवृत्त अधिकारी रामचंद्र शिंत्रे आणि किशोर लांगडे यांनी आपल्या प्रॉव्हिडंट फंडातुन मिळलेले लाखो रुपये गुडविन ज्वेलर्स गुंतविले होते. यांची फसवणूक झाल्याने तेही रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते.

बाईट-
१) महेश तपासे ( राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते )

२) सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ( गुंतवणूकदार )

Conclusion:gudvin
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.