ETV Bharat / state

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली 'त्या' चिमुकलीची भेट

ठाणे येथे राहत असलेले पुजारी कुटुंब करोनाबाधित झाले, परंतु सुदैवाने त्यांची अकरा महिन्यांची मुलगी प्रियांशी ही मात्र, कोरोना निगेटिव निष्पन्न झाली. मात्र, याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी तिची होटलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टिपटॉप प्लाझा येथे जाऊन या चिमुरडीची भेट घेतली.

शिवसेनेने स्वीकारले पालकत्व
शिवसेनेने स्वीकारले पालकत्व
author img

By

Published : May 22, 2020, 12:56 PM IST

ठाणे - कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ठाण्यातील एक कुटुंबही कोरोनाच्या विळख्यात सापडले. परंतु, त्यांच्या ११ महिन्यांच्या मुलीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, सर्व कुटुंबच कोरोनाबाधित असल्याने या चिमुकलीचा सांभाळ कोण करणार, हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या मुलीची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर आज पालक मंत्री एकनाथ शिंदेंनी तिची भेट घेऊन विचारपूस केली आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिमुकल्या प्रियांशीची घेतली भेट

ठाणे येथे राहत असलेले पुजारी कुटुंब कोरोनाबाधित झाले, परंतु सुदैवाने त्यांची अकरा महिन्यांची मुलगी प्रियांशी ही मात्र, कोरोना निगेटिव्ह निष्पन्न झाली. तिला नाईलाजाने रुग्णालयात बाधित आईसोबत राहावे लागणार होते. मात्र, याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी तिची हॉटलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. तिचा सांभाळ शिवसेनेचे बाळा मुदलियार यांची पत्नी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रीना मुदलियार या करत आहेत.

आज(शुक्रवार) पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टिपटॉप प्लाझा येथे जाऊन या चिमुरडीची भेट घेऊन तिची आस्थेने विचारपूस केली. तिला कुटुंबापासून दूर असल्याची जाणीव होऊ नये, या दृष्टीने तिचे पालन व्यवस्थितपणे असल्याची खातरजमा केली. तसेच खेळणी, लागत असलेली औषधे अशा वस्तू कुठल्याही परिस्थितीत कमी पडू न देण्याचे निर्देश दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.