ETV Bharat / state

Gram Panchayat Result 2023 : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपाचं वर्चस्व; ६० पैकी २४ ग्रामपंचायतींवर कब्जा

Gram Panchayat Election Result 2023: ठाणे जिल्ह्यातील थेट सरपंच पदासाठी ६१ ग्रामपंचायतींच्या अंतिम निकालात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. (Thane District Gram Panchayat Election Results) एकरंदरीतच जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींपैकी २४ ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. विशेष म्हणजे, सार्वत्रिक निवडणुकीच्या ६१ पैकी १२ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध विजयी झालेल्या आहेत. तर शहापूरच्या एका ग्रामपंचायतीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

Gram Panchayat Election Result 2023
ग्रामपंचायत धुमशान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 9:25 PM IST

विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून केला विजयोत्सव साजरा

ठाणे Gram Panchayat Election Result 2023: यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्र्याच्या (शिंदे गट) शिवसेनाला १६, उद्धव ठाकरे गटाला ११, कॉंग्रेस २, शरद पवार गट २, जिजाऊ (निलेश सांबरे) २ आणि ३ अपक्षांनी बाजी मारली आहे. मात्र, अजित पवार गटाचा एकही सरपंच निवडून आला नसल्याने ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपाने प्रथम क्रमांक पटकावल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचं वातारण पसरलं आहे. (BJP Won in Thane District )

निवडणूक निकालात भाजपाची सरशी: ठाणे जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी शहापूरमध्ये एका ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने १६ सरपंच पदासाठी मतदान पार पडले होते. भिवंडी तालुक्यात १६ ग्रामपंचायत तर मुरबाडमध्ये सर्वाधिक २९ ग्रामपंचायत निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला. यामध्ये भिवंडीतील १६ पैकी ८ भाजप, ४ अपक्ष ,२ कॉंग्रेस, शिंदे गट १, उद्धव ठाकरे गट १ असा निकाल लागला. मात्र, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला भोपळा मिळाला. विशेष म्हणजे, भिवंडी ग्रामीणमध्ये शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरेंसह उपनेते प्रकाश पाटील यांनी जोरदार प्रचार करूनही एकच ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या राजकीय खेळीने पुन्हा एकदा भिवंडी तालुक्यात भाजपाची सरशी झाली आहे.

उद्धव ठाकरे गटाचे यश: शहापूर तालुक्यातील १६ पैकी ९ ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे गटाने कब्जा करून शिंदे गटासह अजित पवार गटाला धोबीपछाड दिली. येथे एकाही ग्रामपंचायतीवर ना शिंदे, ना अजित पवार गटाच्या नेत्यांना सरपंच निवडून आणता आला. उलट भाजपा ४, शरद पवार गट २, जिजाऊ गटाने (निलेश सांबरे) २ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवत आपले राजकीय अस्तित्व दाखवून दिले. विशेष म्हणजे, शहापूरचे आमदार दौलत दरोडा हे अजित पवार गटाचे आहेत. मात्र, तेही आपले राजकीय वर्चस्व राखू शकले नाही. त्यामुळे अजित पवार गटासह शिंदे गटालाही एकाही ग्रामपंचायतमध्ये यश मिळाले नाही. त्याउलट नुकताच शिंदे गट सोडून शरद पवार गटात सामील झालेले माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दोन ग्रामपंचायतींवर शरद पवार गटाचा झेंडा फडकवला आहे.

मुरबाडमध्ये शिंदे गटाची बाजी: ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मुरबाड तालुक्यात सर्वाधिक २९ ग्रामपंचायतींच्या अंतिम निकालात शिंदे गटाच्या पॅनलने बाजी मारली. १५ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवत शिंदे गटाचे नेते सुभाष पवार यांनी राजकीय अस्तित्व दाखवून दिलं. तर मुरबाडचे भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या पॅनलने १२ ग्रामपंचायतींवर कब्जा केला. उद्धव ठाकरे गटाला १ आणि १ अपक्ष असा अंतिम निकाल जाहीर केला. मात्र, अजित पवार गटाच्या सर्वच पॅनलचा मुरबाडमध्येही धुव्वा उडाला असून एकही ठिकाणी विजय मिळवता आला नाही.

अजित पवार गटासाठी धोक्याची घंटा: अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांची न्हावे ग्रामपंचायत भाजपाच्या कब्जात गेली आहे. एकंदरीतच ठाणे जिल्ह्यात अजित पवार गट एकही ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व दाखवू शकला नसल्याने येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे मतदानाप्रमाणे मत मोजणीही शांततेत पार पडली.

हेही वाचा:

  1. Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायतीत घवघवीत यश; महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
  2. Bawankule On Gram Panchayat Election : भाजपाकडे १ हजार ग्रामपंचायत तर महायुतीस १७०० ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा- चंद्रशेखर बावनकुळे
  3. Gram Panchayat Result २०२३ : काटेवाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा अजित पवार गटाचे वर्चस्व; मात्र दोन जागी भाजपा विजयी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.