ठाणे - एकीकडे कोरोनाचे संकट दुसरीकडे वाढलेल्या किंमती या दुहेरी कैचीत सोने व्यापारी सापडला आहे. दसरा साडेतीन मुहूर्ता पैकी एक मात्र या दिवशी सोनेविक्री निम्म्यावर आली आहे. यामुळे सर्वच सोने विक्रेते हवाददिल झाले आहेत. अशाच प्रकारे जर व्यवसाय राहिला तर हा व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायाकडे जावे लागेल, अशी भावना सुवर्णकार व्यक्त करत आहेत.
दोन वर्षांपूर्वी नोटाबंदी त्यानंतर जीएसटी, कोरोनामुळे टाळेबंदी व आता वाढलेल्या किंमती त्यामुळे सोने विक्रीत मोठी घट निर्माण झालेली आहे. सोनार हे टाळेबंदीपूर्वी ग्राहकांच्या ऑडर घेतल्या. मात्र, टाळेबंदीमुळे त्या ऑर्डर देता आल्या नाहीत. दरम्यान, सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. त्यामुळे नुकसान सोसावे लागले. दसरा, दिवाळी आणि गुडीपाडव्याला सोने विक्री जास्त प्रमाणात होते. लग्न सराई या काळात सोने विक्री होते. मात्र, टाळेबंदीमुळे यावर परिणाम झाला. कामगार पगार बाजार खर्च आदी खर्च करताना सुवर्ण व्यवसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
- 30 हजारांवरुन 57 हजारांवर पोहोचली होती सोन्याची किंमत
या वाढलेल्या किंनतीच्या काळात सोने विक्री मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. जी विक्री होत आहे ती 22 कॅरेट आणि 20 कॅरेट या दर्जाची होत आहे. जानेवारी महिन्यात 30 हजार असलेली किंमत जूनमधे 57 हजारंपर्यंत गेली होती.
- आता किंमत कमी होत आहे तरीही विक्रीत बदल नाही
मागील काही दिवसात किंमत कमी झाली असली तरीही विक्रीमध्ये काहीच बदल झालेले नसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - मीरा भाईंदर महापालिकेचा अनधिकृत बांधकामावर हातोडा, ८० हून अधिक बांधकामे जमीनदोस्त!