ठाणे - मुलीला जीममध्ये प्रशिक्षण देताना विकृत जीम प्रशिक्षकाने तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्या प्रशिक्षकाला अटक केली आहे. गणेश डांगोर असे नराधमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात ही जीम आहे. या जीममध्ये गणेश डांगोर हा जीम प्रशिक्षक म्हणून काम करतो. या जीममध्ये एका अल्पवयीन मुलीने प्रवेश घेतला होता. मात्र, पहिल्या दिवशीच प्रशिक्षण देताना डांगोरने मुलीसोबत घृणास्पद प्रकार केला.
हेही वाचा - घरच्या जेवणास मज्जाव केल्याने कैद्याने घेतला पोलिसाच्या करंगळीचा चावा
या घटनेने भयभीत होऊन पीडितेने त्याच्या तावडीतून सुटका करीत घडलेल्या प्रसंगाची घरच्यांना माहिती दिली. पीडितेच्या पालकांनी तिला घेऊन कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून कोळसेवाडी पोलिसांनी विकृत गणेश डांगोरवर विविध कलमानुसार पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.
हेही वाचा - नवी मुंबई पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंना खंडणीप्रकरणी जीवे मारण्याची धमकी