ETV Bharat / state

अमावास्येच्या रात्री स्मशानात भुतांना आवाहन करत गटारी साजरी

भिवंडी तालुक्यातील नांदकर-बापगाव येथील स्मशानभूमीत विद्यार्थी भारती संघटनेतर्फे 'एक रात्र भुताची' हा आगळावेगळा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

अमावास्येच्या रात्री स्मशानात भुतांना आवाहन देत गटारी साजरी
author img

By

Published : Aug 1, 2019, 8:57 PM IST

ठाणे - बुधवारी गटारी अमावस्येच्या निमित्ताने नागरिकांनी मांसाहार व मद्यपान करून हा दिवस साजरा केला. तर दुसरीकडे मात्र विद्यार्थी भारती या संघटनेतर्फे स्मशानभूमीत 'भूता भूता ये ये' असे आवाहन करीत 'एक रात्र भुताची' हा आगळावेगळा कार्यक्रम मध्यरात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत साजरा करण्यात आला. तरुणांमध्ये भुताखेतांची भीती घालवावी. तसेच, मनात भोंदूगिरी ठासून भरलेल्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

अमावास्येच्या रात्री स्मशानात भुतांना आवाहन देत गटारी साजरी

भिवंडी तालुक्यातील नांदकर-बापगाव येथील स्मशानभूमीत हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी स्मशानभूमी भूत-प्रेत, बुवाबाजी, बाबागिरी कशी समाजात पसरवली जाते याचे पथनाट्यातून सादरीकरण करण्यात आले. तसेच प्रबोधनात्मक गीते सादर करून भुतांना आव्हान करीत गटारीचा आनंद साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात असंख्य महाविद्यालयीन युवक-युवती, पालकवर्ग सहभागी झाले होते.

विद्यार्थी भारती संघटनेच्या माध्यमातून मागील ५ वर्षापासून विविध गावातील स्मशानभूमीत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याद्वारे समाजातील अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा, भुताची भीती घालवण्यासाठी विज्ञानाची कास धरून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे या संघटनेचे अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी सांगितले.

स्मशानभूमीत मध्यरात्रीनंतर जाऊन विविध खेळ खेळण्यासोबत तेथे मांसाहारी जेवणाचा आनंद या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी घेतला. या प्रबोधनातून त्यांच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो, असा अनुभव विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच समाजातील अनिष्ट अंधश्रद्धांना मूठमाती देण्यासाठी आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. यासाठी यासारखे उपक्रम खरोखर समाजोपयोगी असल्याची प्रतिक्रिया स्थानिक युवक मिलिंद जाधव यांनी दिली आहे.

Intro:

Body:अमावास्येच्या रात्री स्मशानात भुतांना आवाहन देत साजरी केली गटारी

ठाणे : दर्श अमावस्या आषाढी अमावस्या प्रमाणेच एकीकडे समाजात प्रचलित गटारी अमावस्याला मांसाहार व मद्य प्रशासन करून हा दिवस श्रावण महिना पाळणारे नागरिक साजरा करीत असतानाच दुसरीकडे मात्र विद्यार्थी भारती या संघटनेतर्फे तरुणांमधील भुताखेतांची भीती घालवावी तसेच मनात भोंदुगिरी ठासून भरलेल्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात या उद्देशाने स्मशानभूमीत भूता भूता ये ये असे आवाहन करीत एक रात्र भुताची हा आगळावेगळा कार्यक्रम मध्यरात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत साजरा करण्यात आला.
स्मशानभूमीत एक रात्र भुताची या कार्यक्रमाचे आयोजन भिवंडी तालुक्यातील नांदकर-बापगाव येथील स्मशानभूमीत हा कार्यक्रम करीत असताना स्मशानभूमी भूत-प्रेत बुवाबाजी बाबागिरी कशी समाजात पसरवली जाते याचे पथनाट्यातून सादरीकरण केले तर प्रबोधनात्मक गीते सादर करून भुतांना आव्हान करीत गटारी चा आनंद मध्यरात्री साजरा केला , या कार्यक्रमात असंख्य महाविद्यालयीन युवक-युवती पालक वर्गात सहभागी झाले होते, विद्यार्थी भारती संघटनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून विविध गावातील स्मशानभूमीत हा उपक्रम राबवून समाजातील अनिष्ट, अंधश्रद्धा भुताची भीती घालवण्यासाठी विज्ञानाची कास धरून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे या संघटनेचे अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी सांगितले.
तर या एक रात्री भुताची कार्यक्रमात अनेक खेळ विद्यार्थ्यांमधील भुताची भीती घालवण्यासाठी मध्यरात्रीनंतर जंगलात जाऊन पुन्हा माघारी येण्याबाबत स्पर्धा, स्मशानभूमीत मटन बिर्याणी चिकन बिर्याणी जेवणाचा आनंद या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी घेतला,
या प्रबोधनातून त्यांच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो , असा अनुभव विद्यार्थ्यांनी सांगितले आहे तसेच समाजातील अनिष्ट अंधश्रद्धांना मूठमाती देण्यासाठी अशा करा कार्यक्रमाचे आयोजन करून देशात अंधश्रद्धेने ज्या पद्धतीने थैमान घातले आहे , ते फार भयंकर आहे सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे यासाठी या उपक्रमाचे खरंच समाजोपयोगी असल्याची प्रतिक्रिया स्थानिक युवक मिलिंद जाधव यांनी दिली आहे.
दरम्यान , अमावस्येच्या रात्री स्मशानात जाऊ नये असे आपण ऐकत असतो त्यामुळे उसाच्या रात्रीच प्रशांत जाऊन पूर्ण रात्र येथे काढणार आणि भुतांनी आम्हाला भेटीला यावे यासाठी भूता भूता येरे आम्ही तुम्हाला भेटायला आलो रे अशा मुलांनी तयार केलेल्या गाण्याच्या चालीवर त्यांना आवाहन करीत होते अनेक विद्यार्थी भीती घेऊन येतात आणि मिळवून जातात वेगवेगळ्या खेळांमध्ये अंधश्रद्धेची पोलखोल केली जाते हे या उपक्रमा राहून दिसून आले आहे.
ftp fid ( 2, bayet 2 vis)
mh_tha_2_smshan_nahit_3_bayet_2_vis_10007

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.