ETV Bharat / state

Gangster Dialogues Viral Video: पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या 'बादशहा'ला बेड्या - Gangster sitting on police officer chair

पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या कक्षातील खुर्चीत बसून (Gangster sitting on Police Officer Chair Thane ) जणू काही आपणच पोलीस असल्याचे भासवत एका शायनरने 'राणी नही तो क्या हुआ, 'ये बादशहा आज भी लाखो दिलो पर राज करता है'.. असा व्हिडिओ तयार करून तो इंस्टाग्रामवर (Gangster dialogues video viral on Instagram) व्हायरल केला. ही घटना मानपाडा पोलीस ठाण्यात घडली आहे. याप्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत 'बादशहा'ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Gangster Badshaha Arrested In Thane) आहे. Thane Crime, Latest News from Thane

Gangster Badshah Viral Photo Thane
गॅंगस्टर बादशाह व्हायरल फोटो ठाणे
author img

By

Published : Nov 1, 2022, 3:33 PM IST

ठाणे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या कक्षातील खुर्चीत बसून (Gangster sitting on Police Officer Chair Thane ) जणू काही आपणच पोलीस असल्याचे भासवत एका शायनरने 'राणी नही तो क्या हुआ, 'ये बादशहा आज भी लाखो दिलो पर राज करता है'.. असा व्हिडिओ तयार करून तो इंस्टाग्रामवर (Gangster dialogues video viral on Instagram) व्हायरल केला. ही घटना मानपाडा पोलीस ठाण्यात घडली आहे. याप्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत 'बादशहा'ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Gangster Badshaha Arrested In Thane) आहे. सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५१, रा. चोळेगाव, ठाकुर्ली ) असे अटक आरोपीचे नाव आहे. Thane Crime, Latest News from Thane

पोलिसांनो, गुंड नाही पकडू शकत तर किमान स्वत:ची खुर्ची तरी सांभाळा

पोलिस अधिकाऱ्याच्या खूर्चीवर बसून गुंडाची डायलॉगबाजी- आरोपी सुरेंद्र हा इंस्टाग्रामवर अनेक वादग्रस्त व्हिडीओ अपलोड करून तो व्हायरल करत असल्याने त्याचे ९० हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यातच मानपाडा पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील रक्कम त्याला परत देण्यासाठी बोलावले होते. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्णा गोरे यांच्याकडे असल्याने आरोपी सुरेंद्र हा त्यांच्या अधिकारी कक्षात २५ ऑक्टोंबरला दुपारी साडेअकरा वाजता आला होता. त्यावेळी अधिकारी नसताना पोलीस अधिकारी गोरे यांच्या खुर्चीत बसून पोलीस अधिकारी असल्याचे भासवत त्याने 'राणी नही तो क्या हुआ, 'ये बादशहा आज भी लाखो दिलो पर राज करता है'.. असा व्हिडिओ तयार करून तो इंस्टाग्रामवर अपलोड केला. त्यानंतर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही गंभीर बाब मानपाडा पोलिसांच्या निदर्शनास आल्याने पोलीस शिपाई विनोद ढाकणे यांच्या तक्रारीवरून सुरेंद्र पाटीलवर भादंवि कलम ३३६, १७०, ५००, क्रिमिनियल लॉसह आर्म्स अक्ट्सह सायबर गुन्ह्या नुसार गुन्हा दाखल केला.

Gangster have no fear of Police
या गुंडाला पोलिसांचा धाक उरला कुठे?

फिल्मी स्टाईलने रिव्हॉल्वर झळकवत डान्स- विशेष म्हणजे पोलिसांच्या खुर्ची बसून व्हिडिओ तयार करण्या अगोदर आरोपीकडे असलेल्या परवानाधारक रिव्हाल्व्हर हातात घेऊन उंचावत फिल्मी स्टाईलने साथीदारांसोबत डान्स करतानाचाही व्हिडिओ इन्स्ट्राग्रामवर अपलोड करून व्हायरल केल्याचे समोर आले आहे. यामुळे परवानाधारक रिव्हाल्व्हरच्या नियमाचे व अटीचे उल्लंघन केल्याने आर्म्स अक्ट्स नुसार गुन्हा दाखल केला.

गुन्हेगारातून पोलिसांचा धाक संपला- मात्र मानपाडा पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. तर दुसरीकडे पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिला नसल्याची चर्चा नेटकरी करताना दिसत आहे. आज आरोपी सुरेंद्रला कल्याण न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.