ठाणे : Ganeshotsav २०२३ : सर्वत्र साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला आता अवघे काही (Ganpati Festival 2023) दिवसच उरलेत. गणपतींच्या सुबक आणि आकर्षक मूर्ती घडवण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. यंदा देखील गणेश भक्तांनी पीओपीच्या मूर्तींना पर्याय म्हणून शाडूच्या मातीच्या मूर्ती आणि कागदाच्या लगद्यापासून बनणाऱ्या मूर्तींना प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतंय. पर्यावरणाविषयी समाजात झालेली जनजागृती पाहता यंदा गणेश भक्तांनी 'इको फ्रेंडली' गणेश मूर्तींना पसंती दिलेली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांची गणेश मूर्ती : ठाणे पातलीपाडा येथील प्रसिद्ध मूर्तिकार वडके यांनी सांगितल की, यंदा 3000 इको फ्रेंडली गणेश मूर्ती (Eco Friendly Ganesha Idol) या विदेशात पाठवण्यात आल्या आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आणि शासकीय निवासस्थानी विराजमान होणाऱ्या दोन्ही मूर्ती कागदाच्या लगद्यापासून वडके यांनीच घडवलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वडके कुटुंबीय मुख्यमंत्री आणि ठाण्यातील बडे नेते, मंत्री यांच्यासाठी मूर्ती घडवण्याचं काम करतायेत.
हजारो गणेश मूर्ती दरवर्षी विदेशात जातात : ठाण्यातील घोडबंदर रोड येथील पातलीपाडा येथे राहणाऱ्या विजय वडके कुटुंबीयांचा गणेश मूर्ती घडवण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. दरवर्षी हजारो मूर्ती घडवून ते त्यांच्या श्री गणेशालय कार्यशाळेत विक्रीसाठी ठेवतात. वडके कुटुंबियांच्या हजारो गणेश मूर्ती दरवर्षी विदेशात जातात. त्याही सर्व इकोफ्रेंडली असतात. यंदाही कॅनडाला 2 हजार, अमेरिकेला 500 तर लंडनला 500 इकोफ्रेंडली गणेशमुर्ती पाठवण्यात आल्या आहेत. या सर्व मुर्ती समुद्र मार्गे सागरी वाहतूकिने पाठवल्या जातात. या मुर्ती विमानाने देखील पाठवता येतात. मात्र त्याचा खर्च हा जास्त असल्याने सागरी मार्गे या मुर्ती पाठवण्यात येत असल्याच वडके कुटुंबीय सांगतात.
व्हीआयपी नेत्यांचे मूर्तिकार म्हणून ओळख : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील आणि मुंबईतील शासकीय वर्षा या निवास्थानी विराजमान होणाऱ्या गणेश मुर्ती देखील याच ठिकाणी घडवल्या जातात, मुख्यमंत्र्यांच्या गणेश मूर्तींवर देखील आता शेवटचा हात फिरवण्याचं काम काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही गणेश मुर्त्या या पर्यावरण पूरक अशा कागदाच्या लगद्यापासून अतिशय सुंदर व सुबक घडवण्यात आल्या आहेत. यावर सुंदर असं नक्षीकाम व हिरे मोत्यांनी जडण घडण करण्यात आलेली आहे. दरवर्षी मुख्यमंत्र्यांची गणेश मूर्ती या ठिकाणीच बनवली जात असल्याचं मूर्तिकार वडके सांगतात. त्यामुळे वडके हे ठाण्यातील व्हीआयपी नेत्यांचे मूर्तिकार म्हणून ओळखले जातात.
यावर्षी दरामध्ये 25 टक्के वाढ : गणेश मूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या माती, पीओपी आवश्यक असलेले रंग आणि दागिन्यांमध्ये सर्वच गोष्टींमध्ये दरवाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचा एकूणच परिणाम गणेशमूर्तींच्या किंमतीवर देखील झालेला आहे. दिवसेंदिवस महाग होणारे रंग आणि दागिने यामुळे गणेश मूर्तींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत.
तर वर्षभर गणेश , देवीच्या मूर्ती बनवण्याचे काम वडके कुटुंबीय करतात. कुटुंबातील दहा सदस्य या व्यवसायामध्ये काम करत असतात. या कामासाठी मजुरांची मोठी गरज त्यांना असते. त्यामुळे वेळेवर मजूरल ही मिळत नसल्यामुळे कामाचा मोठा ताण या कुटुंबीयांवर पडतो.
हेही वाचा -