ETV Bharat / state

उल्हासनगरात तीन मजली इमारतीची गॅलरी दुकानावर कोसळली; जीवितहानी नाही

तीन मजली इमारतीची गॅलरी दुकानावर कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर ४, सुभाष टेकडी परिसरातील व्यंकटेश इमारतत घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

author img

By

Published : Aug 21, 2021, 6:36 PM IST

Updated : Aug 21, 2021, 8:29 PM IST

Ulhasnagar building collapsed news
Ulhasnagar building collapsed news

ठाणे : उल्हासनगरमध्ये एका तीन मजली इमारतीची गॅलरी दुकानावर कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर ४, सुभाष टेकडी परिसरातील व्यंकटेश इमारतत घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. तर उल्हानसागर महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून इमारतमधील राहणाऱ्या रहिवाशांना बाहेर काढत इमारत रिकामी केली आहे.

प्रतिक्रिया

इमारत २० वर्ष जुनी; पालिकेने बजावली होती नोटीस -

उल्हासनगर शहरात इमारतींचे स्लॅब, गॅलरी पडण्याचे सत्र सुरू आहे. आज कॅम्प नंबर ४, सुभाष टेकडी परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास एका २० वर्ष जुन्या तीन मजली इमारतीची गॅलरी तळमजल्यावर असलेल्या दुकानावर कोसळली. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत रिकामी केली. या इमारतीला महापालिकेने यापूर्वी दुरुस्ती करण्यासाठी नोटीस बजावल्याने ८ पैकी ५ प्लॉटधारकांनी यापूर्वीच इमारतमधून स्थलांतर केले होते.

धोकादायक व अनधिकृत इमारतीचा प्रश्न जैसे थे -

शहरातील धोकादायक व अनाधिकृत इमारती नियमित करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ दिवसांपूर्वीच एक कमिटी स्थापन केली होती. मात्र, १५ दिवस उलटूनही कमिटीने कोणताही अहवाल अद्याप दिला नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच शासनाने शहरात मोठी घटना घडण्यापूर्वी अवैध व जुन्या इमारतींबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणीही अनेकांकडून करण्यात आली आहे. व्यंकटेश इमारत खाली केल्यानंतर त्यामधील नागरिकांची महापालिकेने तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

हेही वाचा - तालिबानींनी ताब्यात घेतलेल्या भारतीयांची केली सुटका; नागरिक विमानतळाच्या दिशेने रवाना

Last Updated : Aug 21, 2021, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.