ETV Bharat / technology

एआय तंत्रज्ञान जगासाठी अणुबॉम्बइतकंच धोकादायक - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर - Artificial Intelligence - ARTIFICIAL INTELLIGENCE

एआय तंत्रज्ञान जगासाठी अणुबॉम्बइतकेच धोकादायक असल्याचं मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केलंय. ते नवी दिल्लीस्थित आयोजित कौटिल्य आर्थिक परिषदेत बोलत होते.

External Affairs Minister S Jaishankar
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 7, 2024, 10:07 AM IST

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत मोठं वक्तव्य केलंय. एआय तंत्रज्ञान (Artificial Intelligence) जगासाठी अणुबॉम्बइतकंच धोकादायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वेगाने उदयास येत असलेल्या AI तंत्रज्ञानाचा पुढील दशकात संपूर्ण जगावर परिणाम होईल, असं देखील ते म्हणाले.

AI तंत्रज्ञानात वाढ : नवी दिल्लीस्थित आर्थिक विकास संस्था तसंच वित्त मंत्रालयाच्या भागीदारीत आयोजित कौटिल्य आर्थिक परिषदेला संबोधित करताना जयशंकर बोलत होते. आगामी काळात AI तंत्रज्ञानात खूप वाढ होणार आहे. विविध देशांनी AI च्या प्रभावांवाला तोंड देण्यासाठी तयार रहायाला हवं असं त्यांनी परिषदेत बोलतना सांगितलं. जागतिक परिसंस्थेसाठीही AI महत्त्वाचा घटक बनणार आहे. "AI जगासाठी अणुबॉम्बसारखाच धोकादायक असेल.", असं देखील ते म्हणाले.

AIमुळं जागतिक व्यवस्था बदलणार : डेमोग्राफी, कनेक्टिव्हिटी आणि AI मुळं जागतिक व्यवस्था बदलेल. जागतिकीकरणाला पुढील दशकात शस्त्र बनवलं जाऊ शकतं. जगानं त्याबाबत सजग राहिले पाहिजे. जगातील बरेच लोक बेरोजगारीसह इतर नकारात्मक गोष्टीसाठी तयारा असायला हवं असं, परराष्ट्रमंत्री म्हणाले. "गेल्या दशकात जागतिकीकरणाच्या सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रियेला वेग आला आहे. जागतिकीकरणाच्या वास्तविकता अपरिहार्यपणे संरक्षणवादाशी टक्कर देतातय." आजच्या युगात संयुक्त राष्ट्रांची भूमिका केवळ प्रेक्षकांएवढीच आहे," असं जयशंकर यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का :

  1. PM किसानच्या 18 व्या हप्त्यासाठी तत्काळ करा ई केवायसी, कसं करायचं E KYC? - PM Kisan Samman Nidhi
  2. PM KISAN 18 वा हप्ता जमा : थेट 'या' लिंकवरून तपासा तुमच्या खात्यातील पैसे - pm kisan 18th installment
  3. पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू : 1 कोटी युवकांना रोजगाराची संधी, 'असा' करा अर्ज - Prime Minister Internship Scheme

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.