ठाणे : एका केबल व्यावसायिकाशी आदी फेसबुकवर अनोखळ्या ललनाने मैत्री ( Friendship on Facebook ) केली. त्यानंतर ललनाने प्रेमाचे नाटक करून मित्राने दिलेली हॉटेलमधील जेवणाची ऑफर स्वीकारली. दोघे हॉटेलच्या एका रूममध्ये गेल्यावर काही वेळाने मित्र शौचास गेला असता, ललनाने तिचे रूप दाखवत मित्राचे रिव्हॉल्व्हरसह सोन्याचे दागिने घेऊन पळ काढल्याची घटना घडली ( Girlfriend absconded with jewelry worth lakhs ) आहे. या प्रकरणी केबल व्यवसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुकवर मैत्री, मग चोरी : डोंबिवलीतील मानपाडा रोड परिसरात राहणारा महेश पाटील हा केबल व्यावसायिक आहे. या व्यावसायिकाचे फेसबुकवर अकाऊंट असून त्याच्या अकाऊंटवर संस्कृती खेरमनकर नामक महिलेने मैत्री करण्यासाठी फ्रेंडशिपची रिक्वेस्ट पाठवली होती. तिची रिक्वेस्ट महेशने स्वीकार केली. त्यानंतर मेसेंजरच्या माध्यमातून दोघांत मेसेजची देवाण-घेवाण सुरू झाली. त्यातच महेशन त्या महिलेला बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या खोणी गावाजवळच्या कोहिनूर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी ( Man invite Woman For Dinner at hotel ) बोलविले. त्यानंतर मंगळवारी २१ डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही महिला सदर हॉटेलमधील एका रूममध्ये आली. या हॉटेलच्या रूममध्ये महेश आणि त्या महिलेने दारू पार्टीकरून दोघही मद्यधूंद झाले असतानाच, रात्री अकराच्या सुमारास हा महेश शौचास गेला. तेव्हा त्याने अंगावरील दागीने व रिव्हॉल्वर बाहेर ठेवून गेला होता. हीच संधी साधून त्या महिलेने सोन्याचे दागिने, मोबाईल, रिव्हॉल्व्हर असा 4 लाख 75 हजारांचा ऐवजासह पळ काढला.
महिलेचा शोध सुरु : या संदर्भात केबल व्यावसायिकाने दुसऱ्या दिवशी दुपारी पोलिस मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फेसबुकवर झालेल्या मैत्रिणीच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल ( Cheating In Facebook friendship ) केला. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी हॉटेलमधील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत त्या महिलेचा शोध सुरु केला. या गुन्हा अधिक तपास पोलिस करत असून पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दागिने व रिव्हॉल्वर घेऊन पळालेली महिला गोवा राज्यात असून तिला पकडण्यासाठी एक पथक गोवाला रवाना केले असल्याचे सांगितले.