ETV Bharat / state

Thane Crime: व्यापाऱ्याला दिले कोट्यवधीच्या नफ्याचे आमीष, अन् लावला दीड कोटींचा चुना - कपडा व्यापाऱ्याची फसवणूक ठाणे

एका स्पोर्टवेअर कपडे व्यापाऱ्याला नफ्याच्या बहाण्याने विविध कंपन्यांनी मिळून कट रचत दीड कोटी रुपयांच्यावर चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नरपोली पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या ७ कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane Crime
व्यापाऱ्याची फसवणूक
author img

By

Published : Feb 23, 2023, 7:40 PM IST

ठाणे: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशी-वी मुंबई येथील रहिवासी शाहनवाज मिर्झा हुसेन यांचे भिवंडी तालुक्यातील राहनाळ गावात मनी सुरत कंपाऊंडमध्ये मन्नत इंटरनॅशनल वेअरहाऊस नावाचे कपड्यांचे गोदाम आहे. या गोदामातून १४ फेब्रुवारी २०२२ ते २७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत आरोपी आराध्या एंटरप्रायझेसतर्फे प्रा.दिलीप प्रकाश अग्रवाल (रा.भांडुप मुंबई), मारुती एक्सपोर्टरचे प्रा. प्रेमचंद मित्तल (रा.सांताक्रूझ), यश इंटर प्रोजेक्ट्स (विलेपार्ले,मुंबई), ग्लोबल फॅशन (गोरेगाव ,मुंबई), एस.ए. एंटरप्रायझेस (गोरेगाव,मुंबई), शंकर एंटरप्रायझेस (उल्हासनगर), एटीयूझेड एंटरप्रायझेस (दादर पूर्व) आदींनी ५० लाखांच्यावर स्पोर्ट वेअर (क्रीडा) कपडे विकत घेताना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले होते.

कापड व्यावसायिकाची कोट्यवधींनी फसवणूक: या कंपन्यांच्या मालकांनी सहा महिन्यांच्या कालावधीत शाहनवाज मिर्झा हुसेन यांच्या मन्नत इंटरनॅशनल वेअरहाऊस नावाच्या कपड्यांच्या गोदामातून स्पोर्ट वेअरचे विविध कपडे घेऊन जात फसवणूक केली आहे. या सातही कंपन्यांच्या कापड व्यावसायिकाची १ कोटी ५६ लाख ३० हजार ७० रुपयांची फसवणूक केल्याचे लक्षात आले. या सर्वांविरुद्ध फसवणूक झालेल्या कापड व्यापारी शाहनवाज मिर्झा हुसेन यांच्या फिर्यादीवरून नारपोली पोलिसांनी सात कंपन्यांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास राऊत करीत आहेत.

भिवंडीतही असाच प्रकार: असा एका फसवुकीचा प्रकार भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. मृतक वडिलांना जिवंत भासवून नोटरी करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असगराली मोहमद अली अन्सारी, साकीब असगरअली अन्सारी, असिफ असगरअली अन्सारी, कासिफ असगरअली अन्सारी, सय्यद मोहमद नझीर नकवी, झेड.ए.शेख, मिर्जा अरशद वजीर बेग अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अशी झाली फसवणूक: घटनेचे अधिक वृत्त असे की, फिर्यादी अलाउद्दीन अब्दुल्ला परकार यांचे मयत वडील अब्दुल्लाह शमसुद्दीन परकार आणि चुलत भाऊ आदम सदरुद्दीन परकार यांच्या नावे मौजे शहरातील नागांव येथे जमीन आहे. मात्र अलाउद्दीन परकार यांच्या वडिलांचे ८ जुलै १९८६ रोजी निधन झाले आहे. ही जमीन आदम परकार आणि असगरअली मोहमद अली अन्सारी या दोघांनी संगनमत करून ८ फेब्रुवारी १९९० रोजीच्या कारारनाम्यात फिर्यादी अलाउद्दीन परकार यांचे मयत वडील जिवंत असल्याचे भासविले. यानंतर खोटे इसम उभे करून खोटी सही आणि फोटो लावून बनावट कागदपत्रे तयार केली.

अखेर गुन्हा दाखल: त्यानंतर बोगस कागदपत्राच्या आधारे ही जमीन आरोपी साकीब, आसिफ व कासीफ या तिघांच्या नावे केली. यातील आरोपीत सय्यद नकवी ह्याने खोटे कुलमुखत्यार पत्र बनवून मयत अब्दुल्लाह शमसुद्दीन परकार यांच्या नावाने नोटरी केलेली आहे. त्याचप्रमाणे आरोपीत झेड. ए. शेख यांनी मयत व्यक्तीला ओळखतो म्हणून सही, शिक्का मारलेला आहे. मिर्जा बेग यांनी भिवंडी महापालिकेत समाविष्ट केलेले कागदपत्र खरे असल्याचे प्रमाणित केले आहे. त्यामुळे या सर्वांवर विविध कलमानुसार शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि (प्रशासन) निलेश बडाख करीत आहेत.

हेही वाचा: EPS as Interim GS: एआयएडीएमकेमध्ये पुन्हा एकदा 'एकल नेतृत्त्व'.. सर्वोच्च न्यायालयाने केले शिक्कामोर्तब, पलानीस्वामीच सरचिटणीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.