ETV Bharat / state

ठाण्यात कुर्ला टर्मिनसवर प्रवाशांना लुटणाऱ्या चौकडीला अटक, अशी करायचे लूट

कुर्ला टर्मिनस येथून गाडी पडकल्यास बसण्यासाठी जागा मिळेल, असा बहाणा करीत प्रवाशांना लुटणाऱ्या चौघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

author img

By

Published : May 30, 2019, 10:46 AM IST

कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे

ठाणे - कुर्ला टर्मिनस येथून गाडी पडकल्यास बसण्यासाठी जागा मिळेल, असा बहाणा करीत प्रवाशांना लुटणाऱ्या चौघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बेड्या ठोकल्या आहेत. खळबळजनक बाब म्हणजे हे चोरटे नशेसाठी पैसे नसल्याने उत्तरप्रदेश, बिहार राज्यातील प्रवाशांना लक्ष करीत लूटमार करीत होते. मोहम्मद खान, अफझल खान, दिन मोहम्मद खान आणि फरमान खान, अशी या लुटारूंची नावे आहेत.

उत्तरप्रदेशातील रहिवासी निलेश प्रसाद हे गेल्या गुरुवारी (२८ मे रोजी) वडील आणि दोन मित्रांसह उत्तरप्रदेशला जाण्यासाठी निघाले होते. ते तिकीट काढण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीजवळ उभे होते. यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना हटकले आणि कुर्ला टर्मिनस येथून गाडी पडकली तर जागा मिळेल अशी, थाप मारली. यानंतर ते प्रसादसह त्याचे वडील आणि दोन मित्रांना कुर्ला टर्मिनस येथे घेऊन गेले आणि इतर दोन मित्रांना बोलाऊन त्यांना चाकूने वारकरत मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळील मुद्देमाल घेऊन गेले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास करताना रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत ओळख पटवून या चोरट्यांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान या चोरट्यांना २०१८ साली अशाच एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे जामिनावर सुटल्याचे समोर आले. यांचा शोध सुरू असताना हे पुन्हा २६ मे रोजी पुन्हा कल्याण रेल्वे स्थानकावर सावज शोधत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी झडप घालत या चौघांना अटक केली आहे. अटक असलेल्या चौकडीवर यापूर्वीही चार गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून ३ मोबाईल, दोन चाकू, १६ हजार ५०० रूपये रोख, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रेल्वे डब्यात बसण्यासाठी जागा मिळवून देण्याच्या बाहाण्याने प्रवाशांना लुटणारी चौकडी गजाआड

ठाणे :कुर्ला टर्मिनस येथुन गाडी पडकल्यास बसण्यासाठी जागा मिळेल असा बहाणा करीत प्रवाशांना कुर्ला रेल्वे यार्डात नेऊन त्यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांच्याजवळील मुद्देमाल पळविणाऱ्या चौकडीला कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गजाआड केले आहे.

खळबळजनक बाब म्हणजे हे चोरटे नशेसाठी पैसे नसल्याने उत्तरप्रदेश, बिहार राज्यातील प्रवाशांना  लक्ष करीत लूटमार करीत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मोहम्मद खान, अफझल खान, दिन मोहम्मद खान, फरमान खान असे चोरट्यांची नावे आहे.

उत्तरप्रदेश येथे राहणारे निलेश प्रसाद हे गेल्या गुरुवारी त्यांचे वडील व दोन मित्रासह उत्तरप्रदेश येथे जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकातील तिकीट हॉल मध्ये उभे होते. यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना हटकले आणि त्यांच्याशी ओळख वाढवून तुम्हाला कुर्ला टर्मिनस येथुन गाडी पडकली तर जागा मिळेल अशी थाप मारून त्यांना कुर्ला टर्मिनस येथे घेऊन गेले. कुर्ला स्थानकात पोहचल्यानंतर काही अंतरावर अंधारात नेऊन आपल्या दोन साथीदारांना बोलावून निलेश प्रसादसह त्याचे वडील व मित्राला बेदम मारहाण करत  चाकूने वार करत त्याच्याजवलील मुद्देमाल घेऊन चौकडी पसार झाली. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपासकामी रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत ओळख पटवून या चोरट्यांचा शोध सुरू केला. या तपासादरम्यान या चोरट्यांना 2018 साली अशाच एक गुन्ह्यात अटक करण्यात आली होती त्यानंतर हे जामिनावर सुटल्याचे समोर आले. यांचा शोध सुरू असताना हे पुन्हा 26 मे रोजी पुन्हा कल्याण रेल्वे स्थानकावर सावज शोधत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी झडप घालत या चौघांना अटक केली आहे. अटक असलेल्या चौकडीवर यापूर्वीही चार गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून त्यांच्याकडून 3 मोबाईल, दोन चाकू, 16 हजार 500 रोख, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.