ETV Bharat / state

ठाण्यात चार प्रवाशांना उडवणारा तळीराम चालक अटकेत

पूर्वद्रुतगती महामार्गावरील तीनहात नाका सिग्नलनजीक मुंबईच्या दिशेकडील बस थांब्यावर हा अपघात मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.

कार
author img

By

Published : Nov 6, 2019, 8:36 PM IST

ठाणे - तळीराम चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे चार प्रवाशांना धडक बसल्याची घटना तीनहात नाका येथे मंगळवारी रात्री घडली. चौघेही प्रवाशी मुंबईच्या दिशेकडील बस थांब्यावर बसची प्रतीक्षा करत होते. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. याप्रकरणी राकेश तावडे (वय 36) या कार चालकावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार प्रवाशांना उडवणारा तळीराम चालक अटकेत

हेही वाचा- पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय

पूर्वद्रुतगती महामार्गावरील तीनहात नाका सिग्नलनजीक मुंबईच्या दिशेकडील बस थांब्यावर हा अपघात मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेल्या एर्टिका कारने बस थांब्यावर बसची प्रतीक्षा करीत असलेल्या चार प्रवाशांना उडवले. यातील चार जखमींमध्ये सुनंदा तोरणे (वय 56) या महिलेचा समावेश आहे. यातील विश्वनाथन वेणूगोपालन (वय 67) यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घाटकोपर येथे राहत असलेला चालक राकेश तावडे हा ठाण्यात नोकरी करतो. मंगळवारी मद्याच्या नशेत कारचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. जखमींना सुरुवातीला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर गंभीर जखमींना मुंबईला हलवण्यात आले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी कार चालक तावडे याला अटक केली आहे. त्याची कारही जप्त केली आहे.

Intro:चौघा प्रवाश्याना उडवणारा तळीराम चालक अटकेतBody:

तळीराम चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे चौघा प्रवाश्याना धडक बसल्याची घटना ठाण्यातील तीनहात नाका येथे मंगळवारी रात्री घडली.चौघेही प्रवाशी मुंबईच्या दिशेकडील बस थांब्यावर बसची प्रतीक्षा करीत होते.जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून यात एका महिलेलाही समावेश आहे.याप्रकरणी,राकेश तावडे (36) रा.घाटकोपर या कार चालकावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पूर्वद्रुतगती महामार्गावरील तीनहात नाका सिग्नलनजीक मुंबईच्या दिशेकडील बस थांब्यावर हा अपघात मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेल्या एर्टिका कारने बस थांब्यावर बसची प्रतीक्षा करीत असलेल्या चौघा प्रवाश्याना उडवले.चौघा जखमींमध्ये सुनंदा तोरणे (56) या महिलेचा समावेश असून यातील विश्वनाथन वेणूगोपालन (67) रा.मुंबई यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.घाटकोपर येथे राहत असलेला चालक राकेश तावडे हा ठाण्यात नोकरी करतो.मंगळवारी मद्याच्या नशेत कार चालवीत असताना नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली.जखमींना सुरुवातीला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर गंभीर जखमींना मुंबईला हलवण्यात आले आहे.याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी कार चालक तावडे याला अटक केली असून त्याची कार जप्त केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.