ETV Bharat / state

चिंताजनक; कल्याण डोंबिवलीत आढळले ७१ कोरोनाबाधित रुग्ण; तिघांचा मृत्यू

महापालिका हद्दीत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ३९७ वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी आतापर्यंत ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ६६२ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्यस्थितीत ६९८ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Thane
कल्याण डोंबिवली महापालिका
author img

By

Published : Jun 7, 2020, 2:15 AM IST

ठाणे - कल्याण डोंबिवलीत गेल्या २४ तासात नव्याने ७१ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. डोंबिवलीत तिघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. महापालिका हद्दीत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ३९७ वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी आतापर्यंत ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ६६२ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्यस्थितीत ६९८ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ८ अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेकडील चाळ परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. दरम्यान, आज आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची विगतवारी पाहता डोंबिवली पूर्व १५, डोंबिवली पश्चिममध्ये १५, कल्याण पश्चिममध्ये १५ तर टिटवाळा परिसरात ५ , मात्र कल्याण पूर्वेत रुग्णांच्या संख्येत लाक्षणीय वाढ झाली आहे. आजही कल्याण पूर्वेत २४ रुग्णांची भर पडली असून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाची चिंता वाढणारी असल्याचे दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.