ठाणे : शिवसेनेचे परळ लालबाग विधानसभा मतदार संघातील माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे शुक्रवारी डोंबिवलीत निधन झाले. देसाई यांच्यावर डोंबिवली पूर्वेकडील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णलयाने देसाई यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास कुटुंबियांना सांगितले. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात असताना रुग्णवाहिका बंद पडली. त्यामुळे रुग्णवाहिका ढकल्याची वेळ कुटुंबीयांवर आली. त्याच रुग्णवाहिकेतच माजी आमदार सूर्यकांत देसाई यांनी शेवटचा श्वास घेतला.
रुग्णवाहिका कंपनीविरोधात तक्रार करणार : ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या डोंबिवली पूर्वेकडील एका हॉस्पिटलसमोर घडली. कुटुंबियांनी मंजुनाथ शाळेपर्यतच्या रुग्णवाहिका ढकलावी लागली. देसाई यांचा मुलगा ऋषिकेश याने साई पूजा रुग्णवाहिकेविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, माजी आमदार देसाई हे १९९५ ते २००० पर्यत परळ- लालबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार होते. गेली 23 वर्ष देसाई ते डोंबिवली पश्चिमेकडील भागशाला मैदान येथील काशीकुंज सोसायटी ( जयेश स्मृती )येथे राहत होते. दरम्यान माजी आमदार देसाई यांच्या निधनाची बातमी डोंबिवली, कल्याण शहरात सोशल मीडियावर व्हायरल होताच, शेकडो शिवसैनिकांनी त्यांच्या डोंबिवलीतील राहत्या घरी धाव घेतली होती.
असा झाला सोशल मीडियावर घटनेचा संदेश व्हायरल : माजी आमदार सूर्यकांत देसाई यांना रुग्णवाहिकेमधून ममता हॉस्पिटलला नेण्यात येत होते. त्याचवेळी अचानक रुग्णवाहिका पुन्हा बंद पडली. नातेवाईकांनी क्षणाचाही विलंब न करता त्या ॲम्बुलन्सला पुन्हा धक्का मारायला सुरुवात केली. हा प्रवास कमीत कमी दोन तीनशे मीटर सुरू होता. तरी, ॲम्बुलन्स काही केल्यास सुरू होईना त्यानंतर दुसरी ॲम्बुलन्स मागवण्यात आली. दुसऱ्या ॲम्बुलन्समध्ये पुढचा प्रवास सुरू झाला, या प्रवासातच माजी आमदार सूर्यकांत देसाई यांनी शेवटचा श्वास घेतला. जर कार्डिया कॅम्ब्युलन्स सदोष असती तर वेळेत माजी आमदार सूर्यकांत देसाई ममता रुग्णालयात दाखल झाले असते.