ETV Bharat / state

ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारकाचे काम कमिशनसाठी रखडले, माजी महापौरांचा आरोप - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऐरोली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक इमारतीचे बांधकाम वर्षानुवर्षे रखडवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला जात आहे. या इमारतीच्या बांधकाम, डोमवर कोट्यवधीचा घोटाळा केला जात आहे. नऊ वर्षात हे काम झाले नाही, तर ते अडीच महिन्यात कसे पूर्ण करणार? असे माजी महापौर सुधाकर सोनवणे म्हणाले.

babasaheb ambedkar memorial airoli
डॉ.बाबासाहेब आंबडेकर स्मारक
author img

By

Published : Dec 21, 2019, 11:59 AM IST

नवी मुंबई - नवी मुंबईतील ऐरोलीतील डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्मारकाचे काम गेल्या ९ वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. यामध्ये एक टक्का कमिशन भेटत नाही म्हणून जाणीवपूर्वक रखडले असल्याचा गंभीर आरोप माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी महासभेत केला.

'ऐरोलीतील डॉ.बाबासाहेब आंबडेकर स्मारकाचे काम कमिशनसाठी रखडले'

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने ऐरोलीत डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारक बांधण्यात आले आहे. या स्मारकाचे पाहिल्या टप्प्यात उद्घाटन झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम अजून बाकी आहे. या कामाला दिरंगाई होत असल्याने नगरसेवक संजू वाडे यांनी हे काम कधी होईल? असा सवाल महासभेत विचारत शहर अभियंत्याच्या कार्यशैलीवर घणाघात केला. हे काम होत नाही तोपर्यंत २४ डिसेंबरपासून उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. यावर शहर अभियंता यांनी या भवनाचे काम अडीच महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. यावर माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांना धारेवर धरले. या भवनाचा मुख्य गाभा डोम आहे. त्यावर कधीतरी चढून कामाची पाहणी केली आहे का? असा सवाल करत हे काम एक टक्का कमिशनपोटी जाणीवपूर्वक रखडवले जात आहे. तसेच हे कमिशन कोण मागत आहे? याबाबत माझ्याकडे पुरावे असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कमिशन घेतले जात आहे, ही शरमेची बाब आहे. त्यामुळे हे काम लवकर करण्यात यावे, अशी मागणी सोनवणे यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक इमारतीचे बांधकाम वर्षानुवर्षे रखडवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला जात आहे. या इमारतीच्या बांधकाम, डोमवर कोट्यवधीचा घोटाळा केला जात आहे. नऊ वर्षात हे काम झाले नाही, तर ते अडीच महिन्यात कसे पूर्ण करणार? असेही सोनवणे म्हणाले.

झालेल्या गंभीर आरोपांवर समिती स्थापन करून चौकशी होणार. तसेच त्याची शहानिशा केली जाईल. यामध्ये दोषी आढळल्यास त्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे नवी मुंबईतील महापालिका आयुक्त अण्णा मिसाळ म्हणाले.

येत्या २४ डिसेंबरपासून स्मारकाच्या आवारात उपोषणाला बसणार आहे. काम कधी पूर्ण होणार? याचा कालावधी सांगितला जात नाही, तोपर्यंत उपोषणाला बसणार आहे, असे नगरसेवक संजू वाडे म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. या कामात भ्रष्टाचार सुरू असून एक टक्का कमिशनसाठी हे काम जाणीवपूर्वक लांबवले जात आहे. यामध्ये कोण कमिशन मागत आहे? त्याबाबत माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे या भ्रष्टाचारात महापौरांचा काही सहभाग आहे का? या शंकेला जागा निर्माण करून दिली.

Intro:
डॉ.बाबासाहेब आंबडेकर स्मारकाचे काम टक्केवारी साठी रखडवले...

माजी महापौर सुधाकर सोनवणे यांचा महासभेत गंभीर आरोप

नवी मुंबई:

नवी मुंबई मधील ऐरोलीतील डॉ बाबसाहेब आंबेडकर स्मारकाचे काम गेल्या नऊ वर्षांपासून संथ गतीने सुरू असून हे काम १ % कमिशन नाही भेटत म्हणून जाणीवपूर्वक रखडले असल्याचा गंभीर आरोप माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी महासभेत केला.

नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने ऐरोलीत डॉ बाबासाहेब आंबडेकर स्मारक बांधण्यात आले आहे.या स्मारकाचे पाहिल्या टप्प्याचे उदघाटन झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम अजून बाकी आहे.या कामाला दिरंगाई होत असल्याने नगरसेवक संजू वाडे यांनी हे काम कधी होईल असा जाब महासभेत विचारत शहर अभियंत्याच्या कार्यशैलीवर घणाघात केला .तर हे काम जो पर्यंत होत नाही तोवर २४ डिसेंबरं पासुन उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. यावर शहर अभियंता यांनी या भवनाचे काम अडीच महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.यावर माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांना धारेवर धरत ज्या भवनाचा मुख्य गाभा जो डोम आहे त्यावर कधीतरी चढून कामाची पाहणी केली आहे का?असा सवाल करत सदर काम हे १% कमिशन पोटी जाणीव पूर्वक रखडवले जात आहेत. आणि हे कमिशन कोण मागत आहे याबाबत माझ्या कडे पुरावे आहेत असा गंभीर आरोप केला.तर डॉ बाबासाहेब यांच्या भवनाच्या आडून जर कमिशन घेतले जात आहे ही शरमेची बाब आहे.त्यामुळे हे काम लवकर करण्यात यावे अशी मागणी सोनवणे यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक इमारतीचे बांधकाम वर्षानुवर्षे रखडवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला जात आहे.या इमारतीच्या बांधकाम, डोमवर कोट्यवधीचा घोटाळा केला जात आहे. नऊ वर्षात हे काम झाले नाही तर ते अडीच महिन्यात कसे पूर्ण करणार. असेही माजी महापौर, सुधाकर सोनवणे
यांनी म्हंटले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम उत्तम व्हावे, चांगल्या प्रतीचे दर्जाचे व वेळेत होणे खूप महत्त्वाचे आहे.
जो काही गंभीर आरोप झाला आहे, त्यावर समिती गठित करून चौकशी लावून त्याची शहानिशा केली जाईल, जो यांमध्ये दोषी आढळे त्यावर सक्त कारवाई करण्यात येईल.व या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल देतो. असे नवी मुंबईतील महानगर पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ,
यांनी म्हंटले. २४ तारखेपासून स्मारकाच्या आवारात उपोषणाला बसणार आहे, जोपर्यंत काम कधी पूर्ण होणार याचे कालावधी सांगितले जात नाही तोपर्यंत उपोषणला बसणार आहे असे नगरसेवक संजू वाडे,
यांनी म्हंटले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामात जाणीव पूर्वक दिरंगाई केली जात आहे.आणि या कामात भ्रष्टाचार सुरू असून १% कमिशन साठी हे काम जाणीव पूर्वक लांबवले जात आहे.आणि यात कोण कमिशन मांगत आहे त्याबाबत माझ्या कडे रेकॉर्डिंग आहे .आणि मी जर माझे तोंड उघडले तर तुमच्या अंगावर कपडे राहणार नाही अशा थेट इशारा महापौर जयवंत सुतार यांना दिला. त्यावेळी सभागृहातील सर्व सदस्य अवाक झाले.त्यामुळे या भ्रष्टाचारात महापौरांचा काही सहभाग आहे का?या शंकेला जागा निर्माण करून दिली.
बाईट्स

सुधाकर शिंदे -माजी महापौरBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.