ETV Bharat / state

ठाण्यात 'फ्लेमिंगो'चे आगमन... पक्षीप्रेमी आनंदीत

author img

By

Published : Jan 18, 2020, 11:20 PM IST

नैसर्गिकतेने नटलेल्या ठाणे शहराला निसर्गाने भरभरुन दिले आहे. संजयगांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर, तलावा सोबतच विस्तीर्ण खाडी किनारा अशा सर्वांमुळे शहराची भुरळ सर्वांना पडते. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे भारताच्या इतर भागा बरोबरच युरोप, आशिया खंडातील विविध पक्षी हजारो मैलांचा प्रवास करुन शहराच्या विविध भागात स्थिरावले आहेत.

flamingo-bird-arrival-in-thane
flamingo-bird-arrival-in-thane

ठाणे - हिवाळ्यात ठाणे खाडी परिसरात अनेक पक्षांचे आगमन झाल्यामुळे पक्षीनिरिक्षणाची चांगली संधी पक्षीमित्रांना मिळत आहे. ठाणे खाडी संरक्षित करण्याची मोहिम सरकारने हाती घेतली आहे. वास्तवात खाडीत उत्तरेतून आफ्रिका, युरोप, अमेरिका अंटार्टिका आणि आशिया खंडातील विविध पक्षी तळ ठोकून असतात. हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळ्यात देखील अनेक पक्षी याठीकाणी मुक्कामाला असतात.

ठाण्यात 'फ्लेमिंगो'चे आगमण

हेही वाचा- पाहा, कसं आहे साईबाबांचे जन्मस्थळ; फक्त ईटीव्ही भारतच्या दर्शकांसाठी...

नैसर्गिकतेने नटलेल्या ठाणे शहराला निसर्गाने भरभरुन दिले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर, तलावा सोबतच विस्तीर्ण खाडी किनारा अशा सर्वांमुळे शहराची भुरळ सर्वांना पडते. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे भारताच्या इतर भागा बरोबरच युरोप, आशिया खंडातील विविध पक्षी हजारो मैलांचा प्रवास करुन शहराच्या विविध भागात स्थिरावले आहेत. मात्र, विशेष करुन ठाणे खाडी परिसरात अनेक पक्षांची मांदियाळी भरली आहे. खाडीत फ्लेमिंगो (रोहित) पक्षांचा वावर वर्षभर असल्यामुळे ठाणे खाडी संरक्षित ठेवण्याचा निर्धार सरकार कडून घेण्यात आला आहे. परंतु, फ्लेमिंगो पक्षा बरोबर सिगल्स, रानबदक, सँडपायपर, पेन्टेड स्टार्क, स्पुन बिल सारख्या मनोहारी पक्षांसाठी याठीकाणी निवारा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे खाडीत तब्बल २१५ प्रकारचे पक्ष्यांची नोंद झाली असल्याचे पक्षी अभ्यासक सांगतात.

शहराला तब्बल २७ किमीचा खाडीकिनारा असून वालधूनी आणि उल्हास नदी या खाडीला मिळते. महापालिकेने कोपरीतील मलनि:त्सारण प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करुन तब्बल ४० एमएलडी पाणी खाडीत सोडले आहे. परंतु, हे पाणी जलचरांसाठी पोषक ठरले आहे. खाडीच्या पाण्यात हे पाणी मिसळल्याने या ठिकाणी मासे, चिंबोरी, कोळंबी सारखे जीव वाढत आहेत. अशा जलचरांवर ताव मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षी येताना दिसतात. थंडीच्या दिवसात एकाच वेळी तब्बल दोन ते तीन हजार वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षांचे थवे या ठिकाणी बघायला मिळतात.

फ्लेमिंगो -
फ्लेमिंगोंच्या वर्षभराच्या मुक्कामामुळे ठाणे खाडी प्रकाशझोतात आली आहे. खाडी संरक्षित करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु, केवळ प्लेंमिंगोच नाही तर इतर पक्षांचा मोठा निवारा आहे. ठाणे खंडित ग्रेटर आणि लेसर असे फ्लेमिंगोचे दोन प्रकार आढळतात. त्यापैकी ग्रेटर सैबेरिया तर लेसर हा भारताच्या रणकच्छ परिसरातून हिवाळ्यात येतो. यांचे आवडते खाद्य खाडीतले शेवाळ असून त्याचा गुलाबी रंग आणि चालण्याचा ऐट बघण्यासारखी असते.

Intro:ठाण्यात फ्लेमिंगो च्या आगमनाची सुरवात पक्षीप्रेमी आनंदितBody:हिवाळ्यात ठाणे खाडी परिसरात अनेक पक्ष्यांचे आगमन झाल्यामुळे पक्षीनिरिक्षणाची चांगली संधी पक्षीमित्रांना मिळते, ठाणे खाडी संरक्षित करण्याची मोहिम सरकारने एका फ्लेमिंगो स्वरक्षित खाडी केली आहे वास्तवात खाडीत उत्तरेतून आफ्रिका, युरोप ,अमेरिका अंटार्टिका आणि आशिया खंडातील विविध पक्षी खाडीत तळ ठोकून असतात. हिवाळा पावसाळा आणि उन्हाळ्यात देखील अनेक पक्षी मुक्कामाला आले असतात .

VIO :नैसर्गिकतेने नटलेल्या ठाणे शहराला निसर्गाने भरभरुन दिले आहे, संजयगांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर, तलावा सोबतच विस्तीर्ण खाडी किनारा अशा संर्वांमुळे शहराची भुरळ सर्वांना पडते, सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे भारताच्या इतर भागा बरोबरच युरोप आशिया खंडातील विविध पक्षी हजारो मैलांचा प्रवास करुन शहराच्या विविध भागात पक्षी स्थिरावलेले आहेत, मात्र विशेष करुन ठाणे खाडी परिसरात अनेक पक्षांचे मांदियाळी भरताना दिसते, खाडीत फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचा वावर वर्षभर असल्यामुळे ठाणे खाडी संरक्षित ठेवण्याचा निर्धार सरकार कडून घेण्यात आला आहे, परंतु फ्लेमिंगो पक्षा बरोबर सीगल्स, रानबदकं, सँडपायपर, पेन्टेड स्टार्क, स्पुन बिल सारख्या मनोहारी पक्षांसाठी निवारा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे खाडीत तब्बल २१५ प्रकारचे पक्ष्यांची नोंद झाली असल्याचे पक्षी अभ्यासक सांगतात ..

शहराला तब्बल २७ किमीचा खाडीकानारा असून वालधूनी आणि उल्हास नदी या खाडीला मिळते. महापालिकेने कोपरीतील मलनि:त्सारण प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करुन तब्बल ४० एमएलडी पाणी खाडीत सोडले आहे. परंतु हे पाणी सोडल्यामुळे जलचरांसाठी पोषक ठरले आहे. खाडीच्या पाण्यात हे पाणी मिसळल्याने या ठिकाणी मासे, चिंबोरी, कोळंबी सारखे जीव वाढत असून आणि अशा जलचरांवर ताव मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षी येताना दिसतात. थंडीच्या दिवसात एकाच वेळी तब्बल दोन ते तीन हजार वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे थवे या ठिकाणी बघायला मिळतात.

फ्लेमिंगो :

फ्लेमिंगोंच्या वर्षभराच्या मुक्कामामुळे ठाणे खाडी प्रकाशझोतात आली आहे, खाडी संरक्षित करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत, परंतु केवळ प्लेंमिंगोच नाही तर इतर पक्ष्यांचा मोठा निवारा ही आहे. ठाणे खंडित ग्रेटर आणि लेसर असे फ्लेमिंगोचे दोन प्रकार आढळतात, त्यापैकी ग्रेटर सैबेरिया तर लेसर हा भारताच्या रणकच्छ परिसरातून हिवाळ्यात येतो, यांच आवडत खाद्य खाडीतले शेवाळ असून त्याचा गुलाबी रंग आणि चालण्याचा ऐट बघण्यासारखी असते..

BYTE : प्रशांत सिनकर -पक्षी अभ्यासक

BYTE : पक्षी प्रेमी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.