ETV Bharat / state

भिवंडीत मेट्रोचे काम सुरू असतानाच लोखंडी पिलरचा सांगाडा कोसळला; पाच कामगार गंभीर जखमी

भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील अंजूरफाटा मराठा पंजाब हॉटेलसमोर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मेट्रोच्या पिलरचे काम सुरू असताना सुमारे 30 ते 40 फूट उंचीचा लोखंडी सळईंचा सांगडा कोसळला. या अपघातात 5 कामगार गंभीर जखमी झाले आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Nov 13, 2021, 8:50 PM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील अंजूरफाटा मराठा पंजाब हॉटेलसमोर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मेट्रोच्या पिलरचे काम सुरू असताना सुमारे 30 ते 40 फूट उंचीचा लोखंडी सळईंचा सांगडा कोसळला. या अपघातात 5 कामगार गंभीर जखमी झाले आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळ

मोहम्मद शाहरुख ,मोहम्मद मोहबुत, मोहम्मद अब्दुल अहद, मोहम्मद शकील, मोहम्मद नावेद, जखमी कामगारांची नावे आहेत. नारपोली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करत पुढील कारवाई सुरु केली आहे.

सुदैवाने मोठी जीवितहानी टळली...

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्प 5 चे काम सुरू असून ठाणे ते भिवंडीतील धामणकर नाका या दरम्यान पहिल्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याच मेट्रोच्या लोखंडी सळईंचा सांगाडा रस्त्याच्या मधोमध उभारला जात होता. त्यातच आज (दि. 13) दुपारी लोखंडी सळईंचा सांगाडा कोसळला. विशेष म्हणजे नजीकचा रस्ता वर्दळीचा असताना सुदैवाने लोखंडी सांगाडा रस्त्याच्यामध्ये कोसळला. पण, त्यावेळी कोणतेही वाहन त्या ठिकाणाहून जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या दुर्घटनेनंतर नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. या दुर्घटनेमुले रस्त्याच्या दोन्ही बाजूवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

हे ही वाचा - तलावात विष कालवले, लाखो माशांचा झाला मृत्यू;अज्ञातांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.