ETV Bharat / state

फेरीवाल्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा; हफ्ते घेतानाचा व्हिडिओ व्हायरल - फेरीवाल्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा

आठवडी बाजारातून फेरीवाल्यांकडून हप्ता उकळल्याप्रकरणी फेरीवाल्यानी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाण्यात संजय सिंग, नरेश, रोहन, मामा यांच्यासह माजी नगरसेवक कुणाल पाटील अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी व्हिडिओत पैसे घेताना दिसत असलेल्या संजय सिंग याला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.

extortion case thane
extortion case thane
author img

By

Published : Jan 22, 2022, 10:20 PM IST

Updated : Jan 22, 2022, 10:29 PM IST

ठाणे - आठवडी बाजारातून फेरीवाल्यांकडून हप्ता उकळल्याप्रकरणी फेरीवाल्यानी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाण्यात संजय सिंग, नरेश, रोहन, मामा यांच्यासह माजी नगरसेवक कुणाल पाटील अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी व्हिडिओत पैसे घेताना दिसत असलेल्या संजय सिंग याला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.

प्रत्येकी 100 ते 200 रुपये हप्ता वसूल -
कल्याण पूर्व भागातील आडीवली परिसरात आठवडा बाजार भरवला जातो. कोविडच्या काळात आठवडी बाजार बंद असताना या परिसरात मोठय़ा प्रमाणात फेरीवाले बसतात. या फेरीवाल्यांना धंदा लावण्यासाठी प्रत्येकी 100 ते 200 रुपये हप्ता वसूल केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचा व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. या व्हिडियोत एक व्यक्ती फेरीवाल्यांकडून पैसे वसुली करताना दिसत आहे.

हफ्ते घेतानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचा समावेश -
याप्रकरणी तक्रारदार महिला दीपाली जाधव यांनी शुक्रवारी तिच्याकडे दोन जण आले. त्यांनी पैशाची मागणी केली. आज धंदा झालेला नाही. मी पैसे देऊ शकत नाही, असे त्यांना सांगितले. मात्र ते दोघांनी जबरदस्तीने पैसै मागण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही तर कुणाल पाटील यांच्या ऑफीसमधून काही लोक येतात व धमकवतात, असा आरोप केला. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात दीपाली जाधव यांच्या फिर्यादीनुसार पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संजय सिंग , नरेश, रोहन, मामा यांच्यासह माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचा समावेश आहे.
राजकीय खेळी करुन मला फसविण्याचा प्रयत्न..
या प्रकरणी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले की, हे एक राजकीय षड्यंत्र आहे. राजकीय खेळी करुन मला फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा करावी. मला आणि माझ्या कुटुंबियांना योग्य न्याय द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Jan 22, 2022, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.