ETV Bharat / state

Bhiwandi Fire : कपड्यांच्या गोदामांना भीषण आग; पाच गोदाम जळून खाक - भिवंडी शहर व ग्रामीण

भिवंडी ( Bhiwandi Fire ) तालुक्यातील पूर्ण ग्रामपंचायत हद्दीमध्ये कपड्याची पाच गोदामे जळून खाक ( Burnt Out ) झाली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. 4 ते 5 टँकर पाण्याच्या सहयाने तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर अग्नीशमन दलाच्या ( Fire Brigade ) जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

Bhiwandi Fire
घटनास्थळ
author img

By

Published : Dec 4, 2021, 4:43 PM IST

ठाणे - भिवंडी शहर व ग्रामीण भागात आग लागल्याचे सत्र सुरूच असून आज (दि. 4) कपड्यांच्या गोदामांना अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, गोदामातील साठवून ठेवण्यात आलेले लाखोंचे कपडे जळून खाक ( Burnt Out ) झाले आहे.

घटनास्थळ

भिवंडी ( Bhiwandi Fire ) तालुक्यातील पूर्ण ग्रामपंचायत हद्दीमधील द्रोपती छाया कंपाऊंड परिसरात कपडा साठवणुकीचे गोदामे आहेत. आज पहाटेच्या सुमारास या गोदामांना अचानक आग लागली होती. गोदामात मोठ्या प्रमाणात कपड्याचा मोठा साठा असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. आगीच्या घटनेची माहिती भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यलयात मिळताच सुरुवातील 2 बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम करत होते. मात्र, आगीची तीव्रता पाहता 4 ते 5 पाण्याचे टँकरच्या साहायाने आगीवर तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या ( Fire Brigade ) जवानांना यश आले. मात्र, आग पसरत गेल्याने पाच गोदाम जळून खाक झाले आहेत.

हे ही वाचा - Son-in-Law Raped on Mother-in-Law : २७ वर्षीय जावयाचा ४५ वर्षीय सासूवर बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.