ठाणे- मीरा भाईंदर महानगरपालिका परिसरातील मुंबई- अहमदाबाद हायवेवरील प्रसिध्द असलेले फाउंटन हॉटेल पालिकेकडून सील करण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये पाच कोरोना रुग्ण सापडल्याने पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
फाउंटन हॉटेलमध्ये सापडले पाच कोरोना रुग्णफाउंटन हॉटेलमध्ये सापडले पाच कोरोना रुग्ण घोडबंदर रोडवरील प्रसिद्ध हॉटेलमीरा भाईंदर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून २३ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत फाउंटन हॉटेल सील करण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये पाचपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळल्याने ही कारवाई केली आहे. घोडबंदर रोडवरील एक्सप्रेस इन या हॉटेलमध्ये २१ कोरोना पॉझिटीव्ह कर्मचारी आढळून आले होते. त्यानंतर हायवेवरील सर्व हॉटेलमधील कर्मचा-यांची कोरोना तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यात फाउंन्टन हॉटेलमधील चार कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले होते. यानंतर आज एक कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने नियमाप्रमाणे हॉटेल सील करण्यात आले. फाउंटन हॉटेल ठाणे, मुंबईला जाणा-या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गनजीक घोडबंदर या ठिकाणी आहे. हे हॉटेल नावाजलेले असल्याने येथे ग्राहकांची गर्दी अधिक असतो. त्यात कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने यांच्या संपर्कात आलेल्या ग्राहकांना शोध घेणे गरजेचे झाले आहे.
नियमाचे उल्लंघन, प्रशासन सुस्त
मीरा भाईंदर शहरातील अनेक ठिकाणी विना माक्स नागरिक वावरताना दिसत आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. शहरातील प्रमुख हॉटेलमध्ये देखील कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. हॉटेलमधील कर्मचारी विना माक्स फिरताना दिसतात. तसेच हॉटेलमध्ये सेनेटयाझरची व्यवस्थादेखील नाही. त्यामुळे मीरा भाईंदर शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर प्रशासन झोपी गेले आहे का? असा प्रश्न सामान्य माणूस विचारत आहे.