ETV Bharat / state

Thane Crime News: हॉस्पिटलमध्येच नवजात बालकांच्या खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; डॉक्टरसह पाच आरोपींना अटक - वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड

हॉस्पिटलमध्येच नवजात बालकांच्या खरेदी विक्रीचा गोरखधंदा उघड करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक पाठवून पर्दाफाश केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे २२ दिवसाच्या नवजात बालकाचा सौदा सात लाखात करताना या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

Thane Crime News
नवजात बालकांच्या खरेदी विक्रीचा गोरखधंदा
author img

By

Published : May 19, 2023, 6:51 AM IST

Updated : May 19, 2023, 8:00 AM IST

नवजात बालकांच्या खरेदी विक्री करणाऱ्या टोळीला अटक

ठाणे : ठाण्यामध्ये अपहरण, खून अशा बातम्या आपण ऐकत असतो. परंतु आता चक्क नवजात बाळांची खरेदी विक्रीची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या टोळीतील मुख्य सूत्रधार महिला डॉक्टर आहे. तिच्यासह पाच जणांना अटक केली आहे. डॉक्टर चित्रा चैनानी असे अटक महिला डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्यासह दोन नाशिकच्या महिला एक उल्हासनगरमधील आणि एक बेळगावातील पुरुष आरोपी असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.

हॉस्पिटलमध्ये बालकांची खरेदी विक्री करणारी टोळी : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर तीन परिसरातील कंवरराम चौक भागात असलेल्या महालक्ष्मी नर्सिंग होम या नावाने आरोपी डॉक्टर चित्रा चैनानी यांचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये नवजात बालकांची खरेदी विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी सानिया हिंदुजा, सोनू पंजाबी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाशी संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सानिया हिंदुजा ,सोनू पंजाबी यांनी बाळ खरेदीसाठी मोरे नावाच्या कार्यकर्ता महिलेला बनावट ग्राहक म्हणून पाठविण्याचे ठरले होते.

आयुक्त महोदयांकडे मागणी आमची मागणी आहे, की अशा रॅकेटवर तात्काळ कारवाई करावी. आणि 'बेटी बेचो' अशा अभियानात काम करणाऱ्या महिलांवर कारवाई झाली पाहिजे. - कमलेश निकम, उल्हासनगर राष्ट्रवादी प्रवक्ता

बनावट ग्राहकांच्या माध्यमातून पर्दाफाश : १७ मे रोजी दुपारच्या सुमारास बनावट ग्राहकांच्या माध्यमातून पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखेच्या पथकासह करायचे ठरले. नवजात बालकाची विक्री करण्यासाठी नाशिकहून दोन महिलेपैकी एका महिलेच्या २२ दिवसाच्या बाळाला सात लाखांना बनावट ग्राहकाला विकताना ठाणे गुन्हे शाखेचे पथक आणि ठाणे महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या टोळीला रंगेहाथ पकडले. धक्कादायक म्हणजे नवाजत मुली आणि मुलांचे वेगवेगळे दर या आरोपी महिला डॉक्टरने ठरविले होते. त्यातच बुधवारी २२ दिवसांच्या बाळाची विक्री ७ लाखात होणार असल्याची घटना समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नवजात बाळाची विक्री : दरम्यान महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील टोळी या नवजात बाळाची विक्री करणाऱ्या या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे. या घटनेचा अधिक तपास ठाणे महिला बालकल्याण विभाग आणि ठाणे क्राईम ब्रँच अधिकारी या सगळ्या घटनेची चौकशी करत आहे. लवकरच एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरूवारी महिला डॉक्टरसह पाचही आरोपीना न्यायालय हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

  1. Fake Call Centre Busted: बेकायदेशीर कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, ३२ तरुण-तरुणींना अटक, अमेरिकन नागरिकांची करत होते फसवणूक
  2. Fake Liquor Lab : चंद्रपुरात आढळली बनावट दारूची प्रयोगशाळा; स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश
  3. Pune Crime News: परराज्यातील महिलांचे सुरू होते पुण्यात सेक्स रॅकेट, 'असा' झाला पर्दाफाश

Last Updated : May 19, 2023, 8:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.