ETV Bharat / state

New Variant H3N2 in Thane : ठाण्यात नव्या विषाणूने घेतला पहिला बळी! महापालिकेच्या आरोग्य विभागाला 'एच३ एन२’ व्हेरियंटची धास्ती - आरोग्य यंत्रणा सतर्क

ठाणे जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबरोबरच आता नव्याने आलेल्या ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर, कोरोना आणि ‘एच ३ एन २’ अशा दोन्ही आजारांची लागण झालेल्या एका ७९ वर्षीय वृद्धाचा बुधवारी मृत्यू झाला. नव्याने आलेल्या या विषाणूने ठाण्यात पहिला बळी घेतला असल्याने जिल्हा प्रशासनासह, पालिका आरोग्य विभागाची दाणादाण उडाली आहे.

New Variant H3N2 in Thane
ठाण्यात नव्या विषाणूने घेतला पहिला बळी
author img

By

Published : Mar 25, 2023, 12:34 PM IST

ठाणे : आठवडाभरात कोरोनामुळे मृत्यूची संख्येमध्ये वाढ होत असून, ‘एच ३ एन २’ चा पहिला मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, कोविडमुळे ठाणे ग्रामीण क्षेत्रात एक मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. ठाणे जिल्ह्यात कमी झालेला कोरोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना सक्रिय रुग्णसंख्या २८९ इतकी असून, त्यापैकी १८७ रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण : कोरोनाचे केवळ ११ रुग्ण रुग्णालयात दाखल असून, उर्वरित सर्व होम क्वारंटाईन आहेत. तर, कल्याण-डोंबिवली शहरात २७, नवी मुंबई शहरात २५, उल्हासनगर शहरात २, भिवंडी शहरात १८, मिरा-भाईंदर शहरात १० आणि ग्रामीण भागात १९ इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील मोजकेच रुग्ण रुग्णालयात दाखल असल्याने महापालिके धडकी भरली आहे. त्यातच नव्या व्हेरियंटने एक मृत्यू झाल्याने, ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

आरोग्य यंत्रणा सतर्क : ठाणे महापालिकेतील कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोना रुग्णांची नोंद घेत, त्यांच्यावर महापालिका लक्ष ठेवून आहे. आता केवळ 11 रुग्ण हाॅस्पिटलमध्ये असल्याने त्यांना आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. स्वतः आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ठाणे महापालिकेत 'एच3 एन2' मुळे मृत पावलेल्या रुग्णाची दखल घेत त्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली. आरोग्य मंत्र्यांनी महापालिकेला अलर्ट राहण्याच्या सूचना करीत, नागरिकांनासुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आतापर्यंत महापालिकेत तीन मृत्यू : रुग्णसंख्येत आघाडीवर असलेल्या ठाणे शहरात गेल्या आठ दिवसांत दोन वृद्धांचा मृत्यू झालेला असून, त्यापाठोपाठ बुधवारी आणखी एका ७९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यांना सहव्याधी होती. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचीही लागण झाल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : New Chief justices In High Courts : या तीन उच्च न्यायालयांना मिळाले नवे मुख्य न्यायाधीश, केंद्राने दिली मंजुरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.