ठाणे - ठाण्याच्या राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलबाडमध्ये किरणाचे दुकान चालविणाऱ्या व्यापाऱ्याच्या मुलावर शनिवारी (दि. 5 फेब्रुवारी) रात्री दुचाकीवरून आलेल्या दोघे आरोपींची गोळीबार करत ठार मारण्याचा प्रयत्न ( Thane Firing ) केला. या जीवघेण्या हल्ल्याच्याबाबत जखमीचे वडील गोविंद ठक्कर यांनी राबोडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञातांविरोधात गुन्हा झाला आला आहे. हल्ल्यामागचे कारण अद्याप समजू शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ठाणे शहर परिसरात येणाऱ्या राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलबाड परिसरात गोविंद ठक्कर यांचे किराणा मालाच्या विक्रीचे दुकान आहे. तर त्यांचा मुलगा चेतन गोविंद ठक्कर हा राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपासे नगर चौक येथील पायल ट्रेडर्स हे दुकान चालवतो. शनिवारी रात्री सवानऊ वाजण्याच्या सुमारास चेतन ठक्कर ( रा. ईश्वर सोसायटी कोलबाड, ठाणे) हा तपासेनगर राबोडी परिसरातील आपल्या दुकानातील शिल्लक असलेली दोन लाख रुपयांची रक्कम घेऊन घरी निघाला होता. चेतन हा कोलबाड नाक्यावरील अमृता बियर समोर आला असताना पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवरून आलेल्या दोघा अज्ञातांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने जवळच्या अग्निशस्त्रातून चेतनच्या दिशेने गोळीबार ( Thane Firing ) केला. यात चेतन याच्या पोटात एक गोळी लागली आहे. जखमी अवस्थेत चेतन हा त्याच्या निवासस्थान असलेल्या आईश्वर सोसायटीत घुसल्याने तो बचावला. दरम्यान, हल्लेखोरांनी जखमी चेतन याला ठार मारण्याच्या उद्देशानेच तीन राउंड फायर केल्याची माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली. जखमी चेतनला त्वरित ठाण्याच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दुचाकीवरून हल्लेखोर फरार, यापूर्वीही घडली होती अशी घटना - ठाण्याच्या राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठार मारण्यासाठी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनात एक मृत झाला तर नुकतीच घडलेल्या घटनेत मात्र चेतन हा गंभीर जखमी झाला. 20 नोव्हेंबर, 2020 रोजी राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुसरी राबोडीमध्ये मनसे पदाधिकारी जमील शेख ( Jameel Shaikh Murder Case ) याचीही अशाच प्रकारे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दुचाकीवरुन जाणाऱ्या जमील शेख याच्यावर अगदी जवळून डोक्यात गोळी झाडून पोबारा केला होता. यात जमील शेख यांचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हे ढाखेने आरोपी जेरबंद केले होते तर दुसरी घटना राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी घडली. यात दुचाकी स्कुटीवरून आलेल्या आरोपीनी चेतन ठक्कर याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यात एक गोळी चेतनला लागली आणि तो आपल्या सोसायटीच्या आवारात घुसल्याने दुचाकीवरील आरोपींनी पाठलाग करण्याऐवजी पळ काढला आणि फरार झाले.
राबोडीमध्ये पुन्हा तणाव - शनिवारी (दि. 5 फेब्रुवारी) रात्रीच्या गोळीबाराच्या या घटनेने पुन्हा एकदा राबोडी परिसरात तणाव निर्माण झाला. मात्र, चेतन ठक्कर याच्यावर गोळीबार करण्यामागचे कारण काय आहे याबाबात अद्याप खुलासा झालेला नाही. आता गुन्हे शाखेचे पथक हे घटनेच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पाठविणार आहेत.
हेही वाचा - VIDEO : ठाण्यात भरधाव गाडीने घेतला पेट; कोणतीही जीवितहानी नाही