ठाणे: मैना पक्षी उडत उडत खोपा समजून एका विजेचा खांब असलेल्या पाईपच्या मध्यभागी अडकल्याची घटना समोर आली आहे. या मैनेला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर लोखंडी खांब असलेला पाईप ग्राइंडर मशीनच्या साह्याने कापून तिला सुखरूप काढून जीवदान ( pulled birds out safely ) दिले आहे.
मैना अडकली विजेच्या खांबात: कल्याण पश्चिम भागात सम्राट चौकात माता रमाबाई उद्यान आहे. या उद्यानाच्या लगतच विजेचे खांब (पाईप ) आहे. हे खांब आतून पोकळ असून एका खांबाला मोठे छिद्र पाहून आज दुपारच्या सुमारास मैना पक्षी तिचा खोपा समजून आता गेली. मात्र त्या छिद्रात ती अडकून पडली होती. विशेष म्हणजे तिचा मागचा भाग लोखंडी पाईपात अडकला. तर तिचे डोके आणि चोच बाहेर असल्याने त्या ठिकाणावरून सुटण्यासाठी ती जीवाचा आटापिटा करत असताना या मैना पक्षीला एका नागरिकाने पहिले.
मैनेला सुखरूप बाहेर काढले: त्यानंतर त्यांनीच कल्याण आधारवाडी भागात असलेल्या कल्याण मधील अग्निशमन दलाच्या कार्यलयात संर्पक करून पक्षी पाईपमध्ये अडकल्याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी भडांगे, सदू पागी, पीतांबरे यांच्यासह महिला ३ कर्मचारी घटनस्थळी पोहोचले. त्यानंतर या पक्ष्याला कसे बाहेर काढता येईल दुष्टीने सुरक्षित रित्या लोखंड कापण्याच्या ग्राइंडर मशीनच्या साह्याने कापून तिला सुखरूप बाहेर काढले.
अग्निशमन दलाचे यश: हा पक्षी साळूंकी नावानेही ओळखला जातो, मैनेची एक जात शहरामध्ये, बाग, उद्यानामध्ये तसेच खेडेगावांमध्ये दिसते. या मैनेला भांगपाडी किंवा चन्ना हुडी असंही नाव आहे. हिच्या डोक्यावर भांग पाडल्यासारखी पिसं असतात. सहसा मैना जोडीने वावरतात. प्रसंगानुरूप ती वेगवेगळे आवाज काढते. काही मंजूळ, तर काही कर्कश आवाज काढतात. हा पक्षी सर्वभक्षक असून फळे, धान्य, गांडुळे, टोळ तसेच सर्व प्रकारचे किडेही खातो. त्यामुळे हा पक्षी उद्यान , बाग अथवा शेतात आढळून येत असल्याची माहिती पक्षी मित्र महेश बनकर यांनी दिली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी ‘मैना’ पक्ष्याला सुखरूप काढून जीवदान दिल्याने त्यांनी जवानांचेही आभार म्हणाले.