ETV Bharat / state

पनवेलमध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अग्निशामक अधिकाऱ्याची आत्महत्या

शिंदे यांना अग्निशमन केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून अखेर या अधिकाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

पनवेलमध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अग्निशमन अधिकाऱ्याची आत्महत्या
author img

By

Published : Oct 1, 2019, 4:33 AM IST

ठाणे - खारघर अग्निशामक केंद्रातील अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रमेश शिंदे असे अधिकाऱ्याचे नाव आहे. राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. खारघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

हे ही वाचा - पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून नागपूरमध्ये महिलेची आत्महत्या

खारघर परिसरात सिडको प्रशासनाने अग्निशामक केंद्राची उभारणी केली आहे. याच खारघर अग्निशामक केंद्रात रमेश शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होते. शिंदे यांना अग्निशामक केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून अखेर या अधिकाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याचा आरोप मृत रमेश शिंदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

हे ही वाचा - पत्नीने गळफास घेतल्याचे पाहून पोलीस पतीने घेतले विष

दरम्यान, खारघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संबंधीत घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Intro:पनवेल

सोबत फाईल फोटो वापरणे

पनवेलमध्ये खारघर अग्निशमन केंद्रातील अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रमेश शिंदे असं या अग्निशमन अधिकाऱ्याचं नाव आहे. राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी ही आत्महत्या केली आहे. खारघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. Body:खारघर परिसरात आगीसारखी आपत्कालीन घटना घडल्यास त्यावर ताबडतोब नियंत्रण मिळविण्यासाठी सिडको प्रशासनाने अग्निशमन केंद्राची उभारणी केली आहे. याच खारघर अग्निशमन केंद्रात रमेश शिंदे हा गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होता. मात्र त्याला अग्निशमन केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून अखेर रमेश शिंदे या अग्निशमन अधिकार्याने राहत्या घरी स्वतः ला गळफास घेऊन आपले जीवन संपवले,असा आरोप मृत रमेश शिंदे यांच्या नातेवाईकांनी केलाय. Conclusion:खारघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संबंधीत घटनेचा कसून तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.