ETV Bharat / state

कल्याण-शीळ रस्त्यावर उसळला आगडोंब, झोपड्यांसह झाडांना झळ

एमआयडीसीत असलेल्या मोकळ्या भुखंडावर भंगार माफिया कचरा आणून टाकतात. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काही लोक तो पेटवून देतात. रोज कुणीतरी या ठिकाणी कचरा, टायर, केबल आणून जाळतात. पेटविलेल्या कचऱ्यामुळे प्रचंड प्रमाणात धूर निर्माण होऊन प्रदूषण वाढत चालले आहे. परिसरातील रहिवाशांना खोकला, शिंका आणि श्वसनाचा प्रचंड त्रास होत आहे.

fire

author img

By

Published : Feb 16, 2020, 8:09 PM IST

ठाणे - डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ परिसरातील कल्याण-शिळ रस्त्यावर असलेल्या नेकणीपाडा बस स्टॉप जवळच्या कचऱ्याला रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीची झळ झोपड्यांसह झाडांनाही बसली. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.

fire
साठलेल्या कचऱ्याला लागली आग, झाडांनाही झळ

एकीकडे डोंबिवली औद्योगिक परिसरातील कारखान्यांमुळे प्रदूषण होत असतानाच आजच्या घटनेमुळे प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी औद्योगिक परिसरातील कारखान्यांमुळे प्रदूषण होत नसल्याचा दावा करून कामा संघटनेने डोंबिवलीकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला होता. डोंबिवलीचे भोपाळ होईल की काय, या भीतीने स्थानिक संतप्त झाले आहेत. आसपासच्या कंपन्यांसह भंगारवाले याच परिसरात कचरा आणून टाकतात. साठत गेलेल्या या कचऱ्याला कुणीतरी आग लावल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. झोपड्यांसह कचरा आणि केबलचे बंडल्स पेटल्यानंतर परिसरात धुराचे प्रचंड लोळ उठले होते. यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. ही आग लागली की लावली याचे अग्निशमन दलाला स्पष्टीकरण देता आले नाही.

हेही वाचा - तुमच्यात हिंमत असेल तर लावा नवीन निवडणूक; तुम्ही तिघे आम्ही एकटे

आग लावूनच कचऱ्याची विल्हेवाट

एमआयडीसीत असलेल्या मोकळ्या भुखंडावर भंगार माफिया कचरा आणून टाकतात. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काही लोक तो पेटवून देतात. रोज कुणीतरी या ठिकाणी कचरा, टायर, केबल आणून जाळतात. पेटविलेल्या कचऱ्यामुळे प्रचंड प्रमाणात धूर निर्माण होऊन प्रदूषण वाढत चालले आहे. परिसरातील रहिवाशांना खोकला, शिंका आणि श्वसनाचा प्रचंड त्रास होत आहे.

हेही वाचा - नवीन आर्थिक वर्षापासून सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; शरद पवारांनी दिले संकेत

शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट नाही

घनकचऱ्याच्या विषयावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातील कचऱ्याचे नियोजन कशा पद्धतीने सुरू आहे, यासंबंधी न्यायालयाचे बारीक लक्ष आहे. कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प अनेक वर्षांपासून महापालिका प्रशासन राबवू शकत नसल्याने संतापलेल्या न्यायालयाने महापालिका हद्दीत एकाही नवीन बांधकामाला परवानगी देण्यास मज्जाव केला आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी त्याला जाणीवपूर्वक आग लावण्यात येत असल्याचा कल्याण-डोंबिवलीकरांचा आरोप आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.