ठाणे - ज्वालामुखीचा तालुका म्हणून ओळख असलेल्या भिवंडीत पुन्हा आगडोंब उसळल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरात असलेल्या एका भंगाराच्या गोदामात घडली आहे.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, आगीचे स्वरूप पाहता, भिवंडी अग्निशमन कार्यालयातून खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनाही पाचारण करण्यात आले. विशेष म्हणजे महिन्याभरात खोका कंपाऊंड परिसरात भीषण आग लागल्याची ही तिसरी घटना घडली आहे.
हेही वाचा - सरकार पाडण्याची मर्यादा मी ११ दिवसांनी वाढवली, नारायण राणेंचे भाकीत
हेही वाचा - ...आणि ठाणेकरांच्या नजरा खिळल्या व्हिंटेज कार आणि बाईक्सवर