ठाणे : भिवंडी शहरात भर पावसात इलेक्ट्रॉनिक गोदामांना आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्लोब कॉम्प्लेक्स या नावाचे गोदाम संकुल आहे. या गोदामांत एसी, फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन अशा इलेक्ट्रॉनिक साहित्य साठवून ठेवलेली होती. त्यातच शनिवारी सायंकाळपासून पावसाचे जोरदार आगमन होत असतानाच येथील एका गोदामात रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.
कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक : ही आग काही क्षणातच मोठ्या प्रमाणात पसरत गेल्याने या आगीच्या भक्ष्यस्थानी चार गोदामे पडली होती. या आगीत कोट्यवधी रुपयाचे एसी, फ्रिजसह इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या चारही गोदामामध्ये साठवलेली कोट्यवधी रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भीषण आग विझविण्यासाठी सुमारे सात तासाचा कालावधी लागला आहे. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. - कमलाकर कनात, ड्युटी अधिकारी भिवंडी अग्निशामक दल
आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न : दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत, त्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले. परंतु पाण्याचा तुटवडा भासत असल्याने व त्यातच एसी, फ्रिज यांचे कॉम्प्रेसर स्फोट होत असल्याने आग पुन्हा पुन्हा भडकत रुद्ररूप धारण करत होती. त्यामुळे कल्याण डोंबिवली व ठाणे महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाडयांना पाचारण करण्यात आले आहे. भीषण आग लागल्यामुळे कोट्यावधी रूपयांच्या साहित्याचा कोळसा तयार झाला आहे.
हेही वाचा :
- Pune Fire News: पुण्यातील मार्केट यार्डमध्ये आगीचे सत्र सुरूच; गंगाधाम चौकात गोडाऊनमध्ये भीषण आग
- Chemical Company Fire : अंबरनाथ एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग; आगीत एकाचा मृत्यू, 5 गंभीर
- Coaching Center Fire Delhi: दिल्लीतील मुखर्जी नगरमधील कोचिंग सेंटरला भीषण आग, विद्यार्थ्यांनी खिडकीतून मारल्या उड्या