ETV Bharat / state

डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील इमारतीला भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही

डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्टेशन रोडला असलेल्या एका इमारतीत भीषण आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Jul 15, 2021, 4:43 PM IST

Updated : Jul 15, 2021, 7:04 PM IST

कल्याण-डोंबिवली (ठाणे) - डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्टेशन रोडला असलेल्या लक्ष्मी निवास इमारतीमध्ये गुरुवारी (दि. 15 जुलै) दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूरकोंडी झाली होती. इमारतीमधील रहिवाशांसह तळ मजल्यावरील दुकानदारांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. त्यामुळे जीवितहानी टळली असली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले असून तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

घटनास्थळ

प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीचे क्षणातच रौद्ररूप

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलासमोरच लक्ष्मी निवास इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली. तेथील एका गोडाऊनमध्ये ही आग लागल्यानंतर आगीसह धुराचे प्रचंड लोट उठू लागले. या गोडाऊनमध्ये प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुरकोंडी झाली. ही आग पाहण्यासाठी जवळच्या पादचारी पुलावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. ऐन दुपारच्या वेळी रहदारीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने अग्निशन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते.

इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर

लक्ष्मी निवास इमारत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अतिधोकादायक म्हणून घोषित केली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर काही दुकाने सुरू होती. तर दुसऱ्या मजल्यावर काही दुकानदारांसह फेरीवाल्यांनी आपला माल ठेवला होता. आगीत हा माल भस्मसात झाला. या इमारतीमधील रहिवाशांसह दुकानांतील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.

हेही वाचा - प्रादेशिक परिवहन कार्यालयात पसंतीच्या क्रमांकासाठी ठाणेकरांनी भरली 'एवढी' रक्कम

Last Updated : Jul 15, 2021, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.