ETV Bharat / state

Fierce Fire In Bhiwandi : भिवंडीत फर्निचर कारखान्यासह गोदामाला भीषण आग - ठाण्यातील आगीच्या घटना

भिवंडीत फर्निचर गोदामांसह कारखान्याला भीषण आग ( Fierce Fire In Bhiwandi ) लागल्याची घटना समोर आली आहे. कशेळी येथील चामुंडा कॉम्प्लेक्समधील काईट फर्निचर ( Sumaras Chamunda Complex Fire ) या ठिकाणी अचानक आग लागली आहे. प्रशासनाला माहिती मिळताच भिवंडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेच्या ४ ते ५ गाड्या जवानांसह घटनास्थळी दाखल होऊन आगीवर ६ तासाने नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

Fierce Fire In Bhiwandi
भिवंडीत फर्निचर कारखान्यासह गोदामाला भीषण आग
author img

By

Published : Jan 28, 2022, 1:01 PM IST

ठाणे - भिवंडीत फर्निचर गोदामांसह कारखान्याला भीषण आग ( Fierce Fire In Bhiwandi ) लागल्याची घटना समोर आली आहे. कशेळी येथील चामुंडा कॉम्प्लेक्समधील काईट फर्निचर ( Sumaras Chamunda Complex Fire ) या ठिकाणी अचानक आग लागली आहे. प्रशासनाला माहिती मिळताच भिवंडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेच्या ४ ते ५ गाड्या जवानांसह घटनास्थळी दाखल होऊन आगीवर ६ तासाने नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

भिवंडीत फर्निचर कारखान्यासह गोदामाला भीषण आग

भीषण आगीत संपर्ण फर्निचर जळून खाक -

अग्नीशमन आधिकाऱ्यांनी ( Bhiwandi Fire Department ) दिलेल्या माहितीनुसार, ठाणे मार्गावर भिवंडी तालुक्यातील कशेळी टोल नाक्या नजीकच काईट फर्निचर शोरूम आणि कारखाना आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक या ठिकाणी आग लागली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर असल्याने काही क्षणातच आग गोदाम, कारखाना, लगतच्या दुकानांध्ये पसरली. या गोमात फर्निचर बनविण्याचा कच्चा माल, लाकूड, प्लायवूड, फोम, कापूस मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवले होते. अचानक लागलेल्या या भीषण आगीत संपर्ण फर्निचर जळून खाक झाले आहे. तर आग एवढी भीषण होती की, या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली.

कारण अद्यापही अस्पष्ट -

दरम्यान, ही आग नेमकी कश्यामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नसून आतापर्यंत या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याचेही सांगण्यात आले. घटनास्थळी स्थानिक नारपोली पोलिसांचे पथक दाखल असून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही लगतचे दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली आहे.

हेही वाचा - Foreign Currency Seized Mumbai : मुंबई विमानतळावर तीन महिलांकडून 1 कोटी 29 लाखांचे परकीय चलन जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.