ठाणे - डोंबिवली एमआयडीसी मधील फेज 2 भागात असलेल्या एका कंपनीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ड्रीमलॅंड असे कंपनीचे नाव आहे. या आगीमुळे आतापर्यंत कंपनीमधील लाखो रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या एमआयडीसीमधील कार्यालयाला मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांसह जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. मात्र, आगीचे निश्चित कारण कळू शकले नाही.