ETV Bharat / state

लघुशंकेच्या वादातून हाणामारी; घटना सीसीटीव्हीत कैद - mira bhayandar crime news

भाईदरच्या उत्तन परिसरातील शिरेरोड मोठा क्रॉस येथे राहणाऱ्या डिलॉन डॉमनिक हेनड्रीक्स यांच्या दुचाकी गाडीला रात्री २ च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना घडली आहे.

police
उत्तन पोलीस
author img

By

Published : Oct 28, 2020, 5:42 PM IST

Updated : Oct 28, 2020, 8:57 PM IST

मीरा भाईंदर(ठाणे) - भाईदरच्या उत्तन परिसरातील शिरेरोड मोठा क्रॉस येथे राहणाऱ्या डिलॉन डॉमनिक हेनड्रीक्स यांच्या दुचाकी गाडीला रात्री २ च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना घडली आहे. यात गाडी पूर्णपणे जळाली असून, तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. उत्तन सागरी पोलिसांनी याबाबत कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. लघुशंका करण्याच्या वादातून ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे.

लघुशंकेच्या वादातून हाणामारी; घटना सीसीटीव्हीत कैद

लघुशंकेच्या कारणावरून वाद -

मंगळवारी रात्री ७.३० च्या सुमारास हेनड्रीक्स यांच्या घराबाहेर लहान मुलं खेळत होते. यावेळी अचानक एक २२ वर्षीय अज्ञात व्यक्ती घराजवळ आला व लघुशंका करण्यास सुरुवात केली. त्यावर हेनड्रीक्स यांनी त्याला थांबवले व या ठिकाणी लघुशंका करण्यास मनाई केली. यावरून त्यांच्यात वाद झाला व काही वेळाने तो तरुण त्या ठिकाणाहून निघून गेला. मात्र, लघुशंका करण्यास मनाई केल्याचा राग त्याच्या मनात असल्यामुळे तो बदला घायच्या उद्देशाने रात्री २ च्या सुमारास तो त्या घराजवळ आला व घराबाहेर उभ्या असणाऱ्या दुचाकीवर पेट्रोल टाकून दुचाकीला आग लावली. नंतर त्याठिकाणहून तो निघून गेला. मात्र, ही सर्व घटना घराला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. यात दुचाकी जाळणारा व लघुशंका करणारा व्यक्ती एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे .उत्तन पोलीस पुढील तपास करत आहेत.

Last Updated : Oct 28, 2020, 8:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.