ETV Bharat / state

ठाणे महापालिका : सेवेत रुजू न झालेल्या डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात दाखल होणार गुन्हा - आयुक्त - ठाणे कोरोना अपडेट

महापालिकेकडून अधिगृहित रुग्णालयांमध्ये डॅाक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी संबंधित रुग्णालयांमध्ये कामावर उपस्थित न राहिल्याने संबंधित डॅाक्टर्स आणि इतर कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.

fir against doctors, nurses
सेवेत रुजू न झालेल्या डॉक्टर्स, नर्सेस व अन्य कर्मचाऱ्यांविरोधात दाखल होणार गुन्हा
author img

By

Published : May 27, 2020, 4:10 PM IST

ठाणे - शहरामध्ये कोव्हीड 19 चा सामना करण्यासाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महपालिकेने खासगी रुग्णालये अधिगृहित केली आहेत. या खासगी रुग्णालयातील डॅाक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी संबंधित रुग्णालयांमध्ये कामावर उपस्थित न राहिल्याने संबंधित डॅाक्टर्स आणि इतर कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. याकामी महापालिकेच्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

ठाणे शहरामध्ये कोरोनाचा सामना करता यावा आणि रूग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अनेक खासगी रुग्णालये त्यामध्ये काम करणाऱ्या डॅाक्टर्स आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांसह अधिगृहित करण्यात आली आहेत. महापालिका प्रशासनाने यापूर्वी तसे आदेशही दिले आहेत.

तथापि कौशल्या हॅास्पिटल, होरायझन प्राईम आणि ठाणे हेल्थ केअर सेंटर या रुग्णालयातील डॅाक्टर्स आणि इतर कर्मचारी हे सेवेत हजर झालेले नाहीत. सदरची बाब लक्षात घेवून या तीनही हॅास्पिटलमधील सेवेत हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता (45ॲाफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.

यासंदर्भात होरायझन प्राईम रूग्णालयासाठी डॅा. अनिता कापडणे, ठाणे हेल्थ केअरसाठी डॅा. शलाका खाडे आणि कौशल्या हॅास्पीटलसाठी डॅा. अश्विनी देशपांडे हे वैद्यकीय अधिकारी प्राधिकृत करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.