ETV Bharat / state

विद्यार्थीनीच्या परदेशात उच्च शिक्षणासाठी पोलीस बंदोबस्तात एनओसी

मुलीच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेण्याकरिता घर बँकेत तारण ठेवले. बँकेने घराची मूळ कागदपत्रे घेऊन सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करायला सांगितले. सावंत हे थकबाकीदार असल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र देता येणार नाही, असे कारण सोसायटीने पुढे केले. यामुळे मानपाडा पोलीस ठाण्याच्या २ पोलिसांना सोबत घेऊन सर्वोदय पार्क सोसायटीचे दप्तर ताब्यात घेतले आणि आदिती सावंत हिचे शिक्षण पूर्ण करण्यास बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र मिळवून दिले.

उच्च शिक्षणासाठी एनओसी
author img

By

Published : Oct 3, 2019, 9:20 AM IST

ठाणे - परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या डोंबिवलीकर विद्यार्थीनीला बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी बँकेला एनओसी देण्याकरिता चक्क पोलीस बंदोबस्त घ्यावा लागल्याची घटना डोंबवलीत घडली. शासनाने या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने आडमुठ्या सोसायटीचे दप्तर ताब्यात घेऊन या मुलीला आई-वडील आणि तिच्या स्वतःच्या नावाने असलेले घर तारण ठेवलेल्या बँकेला ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागले. केवळ सोसायटीच्या आडमुठ्या धोरणामुळे या विद्यार्थिनीच्या माता-पित्याला शासनाचे अनेक उंबरठे झिजवावे लागले. यातून सोसायटी कशी असावी आणि असू नये याचा नमुना या घटनेतून समोर आला आहे.

thane
पोलिसांच्या उपस्थितीत ना हरकत प्रमाणपत्र देताना अधिकारी

डोंबिवली जवळच्या नांदीवली टेकडीवर सर्वोदय पार्क नामक सोसायटीत सावंत कुटुंब राहते. अवधूत आणि अनघा यांची मुलगी आदिती ही उच्च शिक्षणासाठी सद्या अमेरिकेच्या आईओवा स्टेट युनिव्हर्सिटी येथे मास्टर्स इन ऐरोस्पेस इंजिनियरिंग म्हणून शिक्षण घेत आहे. आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी लागणारी फी जवळपास पाऊण कोटीच्या घरात आहे. मात्र, इतक्या रकमेची फी न परवडणारी असल्याने सावंत यांनी त्यांचे घर बँक ऑफ बरोडाच्या डोंबिवली शाखेत तारण ठेवले. घराची मूळ कागदपत्रे घेऊन बँकेने सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करायला सांगितले. बँकेने तसे सोसायटीला कळविले. मात्र, सावंत यांची देखभाल (मेंटेनन्स) थकबाकी असल्याची माहिती सोसायटीने बँकेला दिली. त्यामुळे बँकेने आदिती सावंत हिच्या शिक्षणाकरिता लागणारे कर्ज देण्यास हरकत घेतली. अवधूत सावंत यांनी मुलीसाठी शैक्षणिक कर्ज घेण्याकरिता सोसायटीकडे बँकेच्या फॉरमॅट प्रमाणे 27 एप्रिल 2018 ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र, हे प्रमाणपत्र दिले जात नसल्याने सावंत यांनी उपनिबंधकांकडे तक्रार केली. उपनिबंधकांनी प्रमाणपत्र देण्याचे सोसायटीला निर्देश दिले. त्याविरुद्ध सोसायटीने कोकण भवन येथे अपील केले. त्यानंतर उपनिबंधक यांनी त्यांचे आदेश सोसायटी मानत नाही म्हणून प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक केली.

हेही वाचा - कल्याणात 35 लाख रुपयांच्या मोबाईलसह चौकडी ताब्यात

सावंत हे थकबाकीदार असल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र देता येणार नाही असे कारण सोसायटीने पुढे केले. सोसायटीने सावंत यांच्याविरोधात 101 कलमाखाली 2014 साली वसुली दावा दाखल केला तोही उपनिबंधकांनी डिसेंबर 2018 ला नामंजूर केला. विभागीय सहनिबंधक अप्पाराव घोळकर यांनी सोसायटीचे अपील फेटाळून लावले व उपनिबंधक यांचे आदेश कायम ठेवल्यामुळे उपनिबंधक दिनेश चंडेल यांनी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी कलम 80 (1) अन्वये सोसायटीकडून दप्तर ताब्यात घेऊन नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याला सावंत यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा - ठाण्यात बिबट्याची कातडी तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

मानपाडा पोलीस ठाण्याचे दादाहरी चौरे यांनी सुरुवातीला आढेवेढे घेतले. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त दिला. पोलिसांच्या उपस्थितीत उपनिबंधकांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमलेल्या अॅड. भाग्यश्री भंडारी यांनी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी दिलेल्या फौजदारी कार्यवाहीच्या अनुषंगाने मंगळवारी मानपाडा पोलीस ठाण्याच्या २ पोलिसांना सोबत घेऊन सर्वोदय पार्क सोसायटीचे दप्तर ताब्यात घेतले आणि आदिती सावंत हिचे शिक्षण पूर्ण करण्यास बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र मिळवून दिले.

हेही वाचा - भाजपमध्ये बंडाळीची लाट; विद्यमान आमदारांसह 2 जिल्हाध्यक्ष युतीविरोधात निवडणुकीच्या रिंगणात

सोसायटीच्या सेक्रेटरी शरयू तलावडेकर यांनी या कामी प्राधिकृत अधिकारी ऍड. भाग्यश्री भंडारी यांच्या ताब्यात दप्तर देण्याचे सहकार्य केले. या कामासाठी कोकण भुवनचे विभागीय सहनिबंधक अप्पाराव घोळकर, डोंबिवलीचे उपनिबंधक दिनेश चंडेल, कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे, कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, मानपाडा पोलिस ठाण्याचे दादाहरी चौरे, प्राधिकृत अधिकारी अॅड. भाग्यश्री भंडारी यांच्यासह बँक ऑफ बडोदाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. या सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळेच माझ्या मुलीच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचे अवधूत सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा - आधी पाणी, मगच मतदान... अन्यथा बहिष्कार !

Intro:kit 319Body:विद्यार्थीनीच्या परदेशात उच्च शिक्षणासाठी पोलिस बंदोबस्तात एनओसी

ठाणे : परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या डोंबिवलीकर विद्यार्थीनीला बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी बँकेला एनओसी देण्याकरिता चक्क पोलिस बंदोबस्त घ्यावा लागल्याची घटना डोंबवलीत घडली. शासनाने या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने आडमुठ्या सोसायटीचे दप्तर ताब्यात घेऊन या मुलीला आई-वडील आणि तिच्या स्वतःच्या नावाने असलेले घर तारण ठेवलेल्या बँकेला ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागले. केवळ सोसायटीच्या आडमुठ्या धोरणामुळे या विद्यार्थिनीच्या माता-पित्याला शासनाच्या अनेक उंबरठ्यांना झिजवावे लागले. यातून सोसायटी कशी असावी आणि असू नये याचा नमूना या घटनेतून समोर आला आहे.
डोंबिवली जवळच्या नांदीवली टेकडीवर सर्वोदय पार्क नामक सोसायटीत सावंत कुटुंबीय राहते. अवधूत आणि अनघा यांची मुलगी आदिती ही उच्च शिक्षणासाठी सद्या अमेरिकेच्या आईओवा स्टेट युनिव्हर्सिटी येथे मास्टर्स इन ऐरोस्पेस इंजिनियरिंग म्हणून शिक्षण घेत आहे. आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी लागणारी फी जवळपास पाऊण कोटीच्या घरात आहे. मात्र इतक्या रकमेची फी न परवडणारी असल्याने सावंत यांनी त्यांचे घर बँक ऑफ बरोडाच्या डोंबिवली शाखेत तारण ठेवले. घराची मूळ कागदपत्रे घेऊन बँकेने सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करायला सांगितले. बँकेने तसे सोसायटीला कळविले. मात्र सावंत यांची देखभाल (मेंटेनन्स) थकबाकी असल्याची माहिती सोसायटीने बँकेला दिली. त्यामुळे बँकेने आदिती सावंत हिच्या शिक्षणाकरिता लागणारे कर्ज देण्यास हरकत घेतली. अवधूत सावंत यांनी मुलीसाठी शैक्षणिक कर्ज घेण्याकरिता सोसायटीकडे बँकेच्या फॉरमॅट प्रमाणे 27 एप्रिल 2018 ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र हे प्रमाणपत्र दिले जात नसल्याने सावंत यांनी उपनिबंधकांकडे तक्रार केली. उपनिबंधकांनी प्रमाणपत्र देण्याचे सोसायटीला निर्देश दिले. त्याविरुद्ध सोसायटीने कोकण भवन येथे अपील केले. त्यानंतर उपनिबंधक यांनी त्यांचे आदेश सोसायटी मानत नाही म्हणून त्यांनी प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक केली. सावंत हे थकबाकीदार असल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र देता येणार नाही असे कारण सोसायटीने पुढे केले. सोसायटीने सावंत यांच्याविरोधात 101 कलमाखाली 2014 साली वसुली दावा दाखल केला तोही उपनिबंधकांनी डिसेंबर 2018 ला नामंजूर केला. विभागीय सहनिबंधक अप्पाराव घोळकर यांनी सोसायटीचे अपील फेटाळून लावले व उपनिबंधक यांचे आदेश कायम ठेवल्यामुळे उपनिबंधक दिनेश चंडेल यांनी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी कलम 80 (1) अन्वये सोसायटीकडून दप्तर ताब्यात घेऊन नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याला सावंत यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
मानपाडा पोलिस ठाण्याचे दादाहरी चौरे यांनी सुरूवातीला आढेवेढे घेतले. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त दिला. पोलिसांच्या उपस्थितीत उपनिबंधकांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमलेल्या ऍड. भाग्यश्री भंडारी यांनी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी दिलेल्या फौजदारी कार्यवाहीच्या अनुषंगाने मंगळवारी मानपाडा पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांना सोबत घेऊन सर्वोदय पार्क सोसायटीचे दप्तर ताब्यात घेतले आणि आदिती सावंत हिचे शिक्षण पूर्ण करण्यास बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र मिळवून दिले. सोसायटीच्या सेक्रेटरी शरयू तलावडेकर यांनी या कामी प्राधिकृत अधिकारी ऍड. भाग्यश्री भंडारी यांच्या ताब्यात दप्तर देण्याचे सहकार्य केले. या कामासाठी कोकण भुवनचे विभागीय सहनिबंधक अप्पाराव घोळकर, डोंबिवलीचे उपनिबंधक दिनेश चंडेल, कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे, कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, मानपाडा पोलिस ठाण्याचे दादाहरी चौरे, प्राधिकृत अधिकारी ऍड. भाग्यश्री भंडारी यांच्यासह बँक ऑफ बडोदाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. या सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळेच माझ्या मुलीच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचे अवधूत सावंत यांनी सांगितले.

Conclusion:dombiwali
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.