ETV Bharat / state

भिवंडीत बोकडाच्या हाडावरून राडा; चौघांवर गुन्हा दाखल - सेवालाल महाराज जयंती

सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बोकडाचे हाड (खूर) देण्याच्या मानावरून दोन कुटुंबात जोरदार राडा झाल्याची घटना भिवंडीतील पूर्णा गावात घडली आहे.

narpoli police station
नारपोली पोलीस ठाणे
author img

By

Published : Feb 18, 2020, 9:56 PM IST

ठाणे - सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बोकडाचे हाड (खूर) देण्याच्या मानावरून दोन कुटुंबात जोरदार राडा झाल्याची घटना भिवंडीतील पूर्णा गावात घडली आहे. याप्रकरणी ताराबाई पांडुरंग राठोड (वय 55) यांनी राडा घालणाऱ्या कुटुंबाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दीपक हेमलू राठोड (वय 50), पत्नी कमलीबाई राठोड, मुलगा गोविंद राठोड , सचिन राठोड ( सर्व रा. पूर्णा ) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बोकडाच्या हाडाचा (खूर) मान देण्याची प्रथा आरोपी राठोड कुटुंबाची आहे. मात्र, यावर्षी हा बोकडाच्या हाडाचा मान ताराबाई यांच्या लहान सासऱ्यांचा होता. तरी जाणीवपूर्वक आरोपी गोविंद याने हा मान आपल्याकडेच ठेवणार असल्याचे सांगितले. यावरून नाराज झालेल्या तक्रारदार ताराबाई यांचा मुलगा लक्ष्मण राठोड आरोपी गोविंदने दिलेले मानाचे हाड त्यांच्याकडे परत करायला गेला. या गोष्टीचा राग आरोपी गोविंद यास आल्याने त्याने ताराबाई यांच्या मुलास बेदम मारहाण केली. तसेच ताराबाई यांचे पती पांडुरंग राठोड यांच्या डोक्यावर कमलीबाई राठोड यांनी जेवणाचा डबा व तांब्या मारून दुखापत केली. तसेच सचिन व दिपक यांनी ताराबाई यांच्या डोक्यावर तांब्या मारून दुखापत केली आहे. दरम्यान, नारपोली पोलिसांनी बोकडाच्या हाडावरून राडा घालणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - 'जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवू शकत नाहीत'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.