ठाणे : ही घटना भिवंडी लगतच्या खोणी गावातील सलून दुकानात घडली आहे. याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. संतोष गुलाबराव मिसळ असे अटक आरोपीचे नाव आहे. तर रमेश एकनाथ सोनावणे (वय ५६) असे गंभीर जखमी असलेल्या सलून चालकाचे नाव आहे. जखमी रमेश हे भिवंडीतील कोंबडपाडा भागात आपल्या कुटंबासह राहतो. त्याचे भिवंडी लगतच खोणी गावातील ब्रिजजवळ सलूनचे दुकानात आहे. तर आरोपी हा सलून दुकान असलेल्या खोणी गावातील शिवसेना कार्यलयाच्या बाजूला चाळीत राहतो.
मित्राला सल्ला देणे भोवले: त्यातच १९ मार्च रोजी दुपारी बारा वाजता सलून चालक रमेश हे दुकानात ग्राहकाची दाढी करत होते. त्यावेळी सलून चालकाच्या ओळखीचा मित्र आरोपी संतोष हा दुकानात येऊन रमेश यांची मस्करी करीत होता. त्यामुळे सध्या मी ग्राहकांची दाढी करत असून मी कामात आहे, असे रमेश यांनी सांगितले. याचा आरोपी मित्राला राग आला आणि त्याने सलूनच्या दुकानातच ग्राहकांसमोर चालक रमेश यांना मारहाण केली. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आरोपीने सलून चालकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात रमेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या हल्ल्यात रमेश यांचा डोळा बचावला.
आरोपीस अटक: घटनेची माहिती नारपोली पोलिसांना मिळताच सलून चालक जखमी रमेशच्या तक्रारीवरून आरोपी संतोषविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन त्याला काही वेळातच अटक केली. आज अटक आरोपी संतोषला भिवंडी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए. डी. पवार यांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस प्रशासन काय भूमिका घेते तसेच ठाण्यात वाढणारी गुन्हेगारी अशी रोखते याकडे दक्ष नागरिकांचे लक्ष लागले आहे.