ठाणे : भिवंडी कल्याण मार्गवरील लाहोटी कंपाऊंड परिसरात भाजपा नगरसेवक नित्यानंद नाडर (BJP corporator Nityanand Nader) यांच्यावर २० ते २५ जणांच्या हल्लेखोर टोळीने भररस्त्यात कार अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला (fatal attack on a BJP corporator in Thane) केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पक्षाच्या अंतर्गत वादातून जीवघेणा हल्ला (fatally attacked by internal party dispute) झाल्याचे समोर आले असून हल्ल्याची घटना सीसीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांच्या टोळी विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Latest news from Thane, Thane Crime
टोळक्याचा भररस्त्यात हल्ला : भाजपा नगरसेवक नित्यानंद नाडर हे काल रात्रीच्या सुमारास आपल्या कार्यालयातील कामकाज आटपून कार ड्रायव्हर व बॉडीगार्ड सोबत आपल्या खाजगी कारमध्ये घरी निघाले होते. त्यांची कार कल्याण-भिवंडी रोडवरील लाहोटी कंपाऊंड समोरून जात असताना त्यांच्या कारवर वीस ते पंचवीस जणांच्या हल्लेखोर टोळक्यांनी अचानक येऊन जीवघेणा हल्ला चढवत दगड व मारदंड्याचा मारा करत कारची काच फोडून आता बसललेल्या नगरसेवक नाडर यांच्यावर हल्ला केला. शिवाय त्यांच्या कराचे मोठ्या प्रमाणात हल्लेखोरांकडून तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेचा संपूर्ण प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. हल्लेखोरांनी केलेल्या जीवघेणा हल्ल्यात भाजप नगरसेवक नित्यानंद नाडर यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी भिवंडीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस आरोपींच्या शोधात : दरम्यान हा हल्ला भाजपा पक्षातील अंतर्गत वादामुळे झाला असल्याचा आरोप नगरसेवक नित्यानंद नाडर यांनी केला आहे. तर या संदर्भात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ला करणाऱ्या टोळक्यांचा शोध सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी सुरू केला असून एका संशयित हल्लेखोराला पोलिसांनी अटक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र भाजप नगरसेवकावर झालेल्या जीवघेणा हल्ला पक्षाच्या वादातून झालाय का ? कि अन्य कुठल्या वादातून हे मात्र अध्यापही स्पष्ट झालेली नसून पोलीस या घटनेचा तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी दिली आहे.