ठाणे - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाजीपाला लागवड करणारा शेतकरी संकटात सापडलेच पण वीटभट्टी मालक देखील दुहेरी संकटात सापडले आहेत. एका बाजूने वीटभट्टी मजूरकरांनी बनवलेल्या कच्च्या विटांचा मोबदला देत असतानाच अवकाळी पावसामुळे बनवलेल्या लाखो कच्या विटा पावसाच्या पाण्यात विरघळून गेल्या आहेत. यामुळे वीटभट्टी उत्पादन दुहेरी संकटात सापडले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
जोरदार विजेच्या कडकडाटसह अवकाळी पावसाने आज सकाळच्या सुमारास अंबरनाथ, बदलापूर टिटवाळा, कल्याण ग्रामीण मुरबाड आणि शहापूरसह भिवंडीच्या ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर आज पुन्हा सकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस जोरदार बरसला. त्यामुळे वातावरण थोडे अल्हाददायक होऊन गारवा पसरला आहे.
विविध आजारांनी अवकाळी पावसामुळे निमंत्रण -
अवकाळी पाऊस पडताना विजा देखील चमकत होत्या. त्यातच आदींच हिवाळ्यातील गारठ्याने नागरिक रात्रीच्या वेळी कुडकडत असतानाच या अवकाळी पाऊस असल्याने अधिक गारठा वाढण्याची भीती आता नागरिक व्यक्त करत करण्यात आली असून विविध आजारांनी हा अवकाळी पाऊस निमंत्रण देणार असल्याचे दिसून येत आहे.