ETV Bharat / state

रास्त भाव धान्य दुकानदारांचा बेमुदत संप आठव्या दिवशीही सुरूच; गोरगरीब जनतेचे हाल - ठाणे मराठी बातम्या

राज्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांनी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली 1 जूनपासून पुकारलेले बेमुदत बंद आंदोलन आठव्या दिवशीही सुरू आहे. या आंदोलनाचा फटका सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्य गरीब जनतेला बसत आहे.

Fair price shopkeepers go on strike continues
रास्त भाव धान्य दुकानदारांचा बेमुदत संप आठव्या दिवशीही सुरूच; गोरगरीब जनतेचे हाल
author img

By

Published : Jun 9, 2020, 7:23 AM IST

Updated : Jun 9, 2020, 7:46 AM IST

ठाणे - राज्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांनी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली 1 जूनपासून पुकारलेले बेमुदत बंद आंदोलन आठव्या दिवशीही सुरू आहे. या आंदोलनाचा फटका सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्य गरीब जनतेला बसत आहे.

ठाण्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांचा बेमुदत संप...

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये भराई व उतराई हमाली दुकानदारांकडून घेतली जात नाही. अपवाद फक्त ठाणे व पालघर जिल्ह्यातील दुकानदारांकडून ती वसूल केली जाते. त्याचप्रमाणे पंतप्रधान योजनेतील मोफत धान्य वितरण कामाचा मोबदला मिळावा, तामिळनाडू राज्य शासनाच्या धोरणानुसार दुकानदारांना मानधन व प्रत्येक दुकानदारास 50 लाखांचा विमा सुरक्षा कवच मिळावा, या मागण्यांसाठी पुकारलेल्या या संपामध्ये भिवंडी तालुक्यातील 157 दुकानदार, तालुका अध्यक्ष शांताराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले आहेत.

भिवंडी तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागातील तब्बल 83 हजार 190 शिधावाटप पत्रिकेवरील 2 लाख 87 हजार 542 नागरीक हे मोफत तसेच रास्तभाव दराने धान्य खरेदी पासून वंचित आहेत. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे नागरीकांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना या संपामुळे गोरगरीब, आदिवासी आणि कष्टकरी कुटुंबियांची कुचंबना होत आहे.

हेही वाचा - मराठी तरुणांना 'बिझनेस ऑन व्हील'साठी प्रोत्साहन देण्याची मनसेची मागणी

हेही वाचा - खासगी लॅबचे अहवाल चुकीचे, ठाणे महापालिकेकडून थायरोकेअरवर बंदी

Last Updated : Jun 9, 2020, 7:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.