ETV Bharat / state

Fake MPCB officials Arrested : एमपीसीबीचे अधिकारी असल्याची थाप मारून खंडणीखोरी; एकास अटक

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB officials) अधिकारी असल्याचे सांगून डोंबिवली परिसरातील कारखानदारांकडून खंडणी वसुली (Fake  Extortion from factory owners) करणाऱ्या तिघा तोतयांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (case filed against fake MPCB officer) करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत एकास अटक (one arrested in case of extortion) केली असून अन्य दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

Fake MPCB officials Arrested
एमपीसीबीचे अधिकारी असल्याची थाप मारून खंडणीखोरी
author img

By

Published : Dec 19, 2022, 7:51 PM IST

ठाणे : मयंक यशवंत घोसाळकर (34, रा. लोढा काउंन, आर्कीड बिल्डींग, ई विंग, रूम नं. 311, खोणी-पलावा) असे अटक (one arrested in case of extortion) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मनोज घोसाळकर आणि समीर चौधरी (रा. गोरेगांव, मुंबई) यांचा शोध घेण्यात येत आहे. या संदर्भात डोंबिवली पूर्वेकडील पाथर्लीतल्या टिळकनगर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या ओम समर्थ विहार सोसायटीत राहणारे राजेश शारदाप्रसाद यादव (56) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार (Fake Extortion from factory owners) पोलिसांनी भादंवि कलम 170, 171, 384, 385, 420, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल (case filed against fake MPCB officer) केला आहे.

अधिकाऱ्यांने खोटे व्हिजीटींग कार्ड : तक्रारदार राजेश यादव यांचा कल्याण-शिळ मार्गावरील दावडी गावातल्या तुकाराम चौकात आर. वाय. पावडर कोटींग नावाचा कारखाना आहे. मयंक घोसाळकर, मनोज घोसाळकर आणि समीर चौधरी या त्रिकुटाने आपसात संगनमत करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असल्याचे खोटे व्हिजीटींग कार्ड बनवले. त्याद्वारे आपण महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी असल्याचे भासवून त्यांनी आपल्या कंपनीतून 35 हजार रुपये रोख रक्कम खंडणी स्वरूपात स्विकारली. तसेच या त्रिकुटाने कल्याण-डोंबिवली परिसरातील इतरही पावडर कोंटीग कंपन्यांची फसवणूक केल्याचे राजेश यादव यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सपोनि अनिल भिसे अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.