नवी मुंबई - कोविड काळात लॉकडाऊनमुळे सर्वांनाच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आयुक्त अभिजित बांगर यांनी अभय योजना लागू केली. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. याचा मोठ्या प्रमाणावर लाभ नवी मुंबईकर नागरिकांनी घेतला व 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या आर्थिक वर्षात नवी मुंबई महापालिकेत मालमत्ता करापोटी 540 कोटी ६६ लाख 13 हजार 742 इतकी रक्कम जमा झाली आहे.
1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत नागरिकांनी घेतला अभय योजनेचा लाभ -
अभय योजनेच्या अंतर्गत 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत 19 हजार 891 लोकांनी लाभ घेतला आहे. 159 कोटी 16 लाख 29 हजार 593 इतकी रक्कम अभय योजनेंतर्गत पालिकेला मिळाली आहे. 15 डिसेंबर ते 15 मार्चपर्यंत थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रकमेवर नवी मुंबई मनपाने 75% सूट दिली. 16 मार्च ते 31 मार्च या कालावधीत 50% सूट देण्यात आली. त्यामुळे वर्षभरात 540 कोटीपेक्षा अधिक रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली.
कोविड काळातही मालमत्ता कर भरण्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद -
कोविड काळात कित्येक नागरिकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. मात्र अभय योजना लागू केल्यामुळे मालमत्ता कर भरण्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे.
कोरोना काळातही नवी मुंबई मनपाच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी 540 कोटींहून अधिक रक्कम जमा - नवी मुंबई महापालिकेत संपत्ती कर जमा
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आयुक्त अभिजित बांगर यांनी अभय योजना लागू केली. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. याचा मोठ्या प्रमाणावर लाभ नवी मुंबईकर नागरिकांनी घेतला व 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या आर्थिक वर्षात नवी मुंबई महापालिकेत मालमत्ता करापोटी 540 कोटी ६६ लाख 13 हजार 742 इतकी रक्कम जमा झाली आहे.