ETV Bharat / state

Special Team With Eknath Shinde : बंडखोर आमदारांची काळजी घेण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंच्या खास टीमवर - महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

शिवसेनेमध्ये ( Shivsena ) एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मोठी बंडखोरी घडवून आणल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार घेऊन पहिले गुजरात आणि नंतर गुवाहटी गाठणाऱ्या सर्व आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंची एक विशेष टीम करीत आहे. हे सर्व एकनाथ शिंदे यांचे महापालिकेतील जुने विश्वासू सहकारी आहेत.

Ekanath Shinde Team
Ekanath Shinde Team
author img

By

Published : Jun 22, 2022, 4:45 PM IST

ठाणे - शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी घडवून आणल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार घेऊन पहिले गुजरात आणि नंतर गुवाहटी गाठणाऱ्या सर्व आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंची एक विशेष टीम करीत आहे. हे सर्व एकनाथ शिंदे यांचे महापालिकेतील जुने विश्वासू सहकारी आहेत.

जुन्या सहकाऱ्यांवर दिली जबाबदारी - राज्य सरकारचे अस्तित्व धोक्यात घालणारे मोठे बंड शिवसेनेत पाहायला मिळाल्यानंतर या सगळ्या प्रकारणामधे ठाण्याचा मोठा सहभाग आहे हे आता समोर आले आहे. या बंडाचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले ठाणे जिल्ह्यातले आमदार आणि महाराष्ट्रभरातील आमदार या सगळ्यांची व्यवस्था करण्यासाठी एकनाथ शिंदे यांची खास टीम कार्यरत आहे. ही टीम म्हणजे एकनाथ शिंदे यांचे जुने महापालिकेतले सहकारी हे आजही सुरतपासून गुवाहाटीपर्यन्त त्यांच्यासोबत आहेत. या बंडाच्या दरम्यान ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि व्यवस्था ही ठाण्यातल्या जुन्या सहकाऱ्यांकडून केली जात आहे.

प्रत्येक कामात शिंदेंसोबत - आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षाने टाकलेल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ज्यामध्ये केरळचा पूर असो की कोल्हापूरमधली पूरस्थिती महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरील समस्यांच्या वेळेस शिवसेना पक्ष नेतृत्वाकडून जेव्हा जेव्हा आदेश आले तेव्हा ते आदेश पूर्ण करत ठाण्यातली हीच टीम एकनाथ शिंदे यांच्या सोबत कायम पाहायला मिळालेली आहे. राज्यातले उलटफेर होत असतानाही टेंभी येथील एकनाथ शिंदे यांच्यासोबत कार्यरत आहे. एकनाथ शिंदे यांना या टीमवर असलेला विश्वास आणि या टीमने आतापर्यंत एकनाथ शिंदे यांना दिलेली साथ यामुळेच एकनाथ शिंदे हे आजपर्यंत सर्वच पातळीवर ती यशस्वी राहिलेले आहेत.

कोण कोण आहेत या एकनाथ शिंदे टीममधे - एकनाथ शिंदे यांचे जुने सहकारी जे ते शाखाप्रमुख असल्यापासून सोबत असलेले सहकारी आहेत. ज्यामधे
त्याचे निकटवर्तीय राम रेपाळे, गिरी डे, एकनाथ भोईर, शरद कणसे, संदीप शेलार, भाई खाडे यांचा समावेश आहे. हे सर्वजण आतापर्यंत शिवसेनेच्या अनेक मोहिमांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक, तिन्ही पक्षाचे नेते राहणार उपस्थित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.