ETV Bharat / state

Lok Sabha Election Thane :अनेक नेते शिवसेनेतच; कल्याण लोकसभा जागा जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे यांना लावावा लागणार जोर - एकनाथ शिंदे गट

नवी मुंबर्ई आणि अंबरनाथमधील बहुतांश शिवसेना नगरसेवकांनी शिंदे गटाला जाहीर पाठींबा दिल्यानंतर तब्बल 24 दिवसानंतर काल उल्हासनगर आणि भाईंदरातील नगरसेवकांनी (Ulhasnagar Bhayander corporator) आपली चुप्पी सोडत शिंंदे गटाला पाठींबा जाहीर (Support Shinde Group) केला. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात त्यामुळे जमेचं गणित सुरू झालं असलं तरी अद्यापी बालेकिल्ला निर्धोक झाला नसल्याचं चित्र ठाणे-पालघरात दिसत आहे.

New Mumbai
नवी मुंबर्ई
author img

By

Published : Jul 15, 2022, 7:01 PM IST

ठाणे : नवी मुंबर्ई आणि अंबरनाथमधील बहुतांश शिवसेना नगरसेवकांनी शिंदे गटाला जाहीर पाठींबा दिल्यानंतर तब्बल 24 दिवसानंतर काल उल्हासनगर आणि भाईंदरातील नगरसेवकांनी आपली चुप्पी सोडत शिंंदे गटाला पाठींबा जाहीर केला. शिवसेनेतल्या बडांनंतर ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांनी ठाणे-पालघरावर लक्ष केंंद्रीत केलं होतं. मात्र ठाण्यातून खासदार राजन विचारे, कल्याणात जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, बाळ हरदास, बंड्या साळवी, भिवंडीचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील ही शिंदेंची माणसं सेनेतच राहिली. त्यामुळे शिंदे गटाला बालेकिल्ल्यातले अनेक बुरूज लढवावे लागतील याचा अंदाज आला होता. मात्र तब्बल 24 दिवसानंतर आता भाईंदर आणि उल्हासनगरच्या नगरसेवकांनी सेना सोडल्यामुळे शिंदेंच्या बालेकिल्ल्याला थोडी राहत मिळाली आहे.

संघर्ष करावाच लागेल -आता ही वस्तुस्थिती असली तरी आता दोन गट समोरासमोर अटळ असल्याचं चित्र उघड झालं असून, ठाणे आणि कल्याण या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर त्याचे ठळक पडसाद उमटतील हे स्पष्ट झालं आहे. याशिवाय पक्ष म्हणून मोठी भूमिका असलेल्या दोन्ही जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती, तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदेतले सदस्य मात्र अद्यापी सायलेन्स मोडवर आहेत. तर पक्ष म्हणूनही भिवंडी, वसई, शहापूर, मुरबाड, बदलापूर सारखी मोठी शहरांमधल्या पक्ष घटकांकडून अद्यापी निर्णय झालेला नाही. या गोष्टीदेखील शिंदे गटाला डोकेदुखी ठरू शकतात. त्यामुळे बालेकिल्ल्यात नगरसेवक गेले तरी गड झुंजत ठेवावा लागेल. संघर्ष करावाच लागेल असं चित्र आताच स्पष्ट होऊ लागले आहे.

कोण कोण आहेत शिवसेनेत - ठाण्याचे खासदार राजन विचारे, गोपाळ लांडगे ,बंड्या साळवी ,अरविंद वाळेकर ,सुभाष भोईर ,आमदार रुपेश म्हात्रे हे नेते शिवसेनेत आहेत. आणि इतरही मोठे नेते अजूनही शिंदे गटाच्या हाताला लागले नाही. या सर्वच नेत्यांचा स्थानिक पातळीवरती मोठा जनसंपर्क असून हे नेते प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाची भूमिका साकारत असतात. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ठाणे आणि कल्याण लोकसभा (Lok Sabha Election Thane )जागा जिंकण्यासाठी

हेही वाचा : CM Eknath Shinde Group : शिंदे गटातील निम्म्याहून अधिक आमदारांचे भवितव्य पणाला यांना जोर लावावा लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.