ETV Bharat / state

Eknath Shinde : राजकीय भाष्य करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे दाखविले बोट, म्हणाले... - एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 89व्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्या प्रसंगी बोलत होते. अडीच वर्षाचे सरकार आणि अडीच महिन्याचे सरकार यात फरक आहे. गेल्या अडीच वर्षात जे झालं नाही ते आम्ही अडीच महिन्यात (Eknath Shinde statment at mathadi melava)केले. मी राजकीय भाष्य करणार (dont make political comments)नाही, तसे मला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Sep 25, 2022, 4:44 PM IST

Updated : Sep 25, 2022, 5:19 PM IST

नवी मुंबई : अडीच वर्षाचे सरकार आणि अडीच महिन्याचे सरकार यात फरक आहे. गेल्या अडीच वर्षात जे झालं नाही ते आम्ही अडीच महिन्यात (Eknath Shinde statment at mathadi melava)केले. मी राजकीय भाष्य करणार (dont make political comments)नाही, तसे मला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मी जरी मुख्यमंत्री असलो तरी सोबत अनुभवी देवेंद्र फडणवीस आहेत, असे सांगत न कळतपणे रिमोट फडणवीसांच्या हातात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी कबूल केले.

सरकारला जनतेचा पाठिंबा - नवी मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 89व्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्या प्रसंगी (Mathadi Melava) बोलत होते. अण्णासाहेबांनी व्यवस्थित केलेल्या मांडणीमुळे आज माथाडी कामगारांना सुगीचे दिवस आल्याचे म्हणत शिंदेनी माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी जाहीर निवड केली.

माथाडी कामगारांच्या अनेक संघटना असल्या तरी त्या कामगारांना न्याय देणाऱ्या असाव्यात चुकीचं कामं करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे सरकार देणारे आहे घेणारे नाही. जिकडे आम्ही जातो तिकडे लाखो लोकं येतात या सरकारला जनतेचा पाठिंबा असल्याचे शिंदे म्हणाले. या मेळाव्याला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडींच्या नावावर खंडणी मागणाऱ्या वसूली सम्राटांची गय केली जाणार नाही या वसूली बहाद्दरांची शिफारस घेऊन कोणीही माझ्याकडे यायचे नाही. पोलिसांच्या माध्यमातून यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे फडणवीस (Eknath Shinde statment Devendra Fadnavis) म्हणाले.

माथाडी मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस

माथाडी कामगार हे घरकर्ज नक्की फेडतील - आण्णासाहेब आर्थिक महामंडळाला आम्ही पुनर्जीवित केली असल्याचे सांगताना नरेंद्र पाटलांच्या पाठपुराव्यामूळे 50 हजार मराठा तरुणांना उद्योजक बनण्याची संधी मिळाल्याचेही फडणवीस म्हणाले. नुकतीच स्वर्गीय अण्णासाहेब विकास महामंडळावर जाहिर नियुक्ती झालेल्या नरेंद्र पाटील यांनी एकनाथ शिंदे हेच खरे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वारसदार असल्याचे म्हटले. नरेंद्र पाटील यांनी प्रवीण दरेकरांना माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरांच्या प्रकल्पासाठी मुंबई बँकेकडून 200 ते 300 कोटी रुपये कर्ज देण्याची विनंती केली.

माथाडी कामगार हे घरकर्ज नक्की फेडतील, असे आश्वासन देखील यावेळी पाटलांनी दिले. नरेंद्र पाटील यांनी कोरोना महामारीत मुंबईकरांसाठी माथाडी कामगारांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल बोलताना जीव गमावलेल्या 28 माथाडी कामगारांच्या स्मृतींना उजाळा दिला. या मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुणवंत माथाडी कामगारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या मेळाव्यासाठी खा. शिवेंद्रराजे भोसले, आ. प्रवीण दरेकर, आ. गणेश नाईक, आ. मंदा म्हात्रे, आ. नरेंद्र पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. निरंजन डावखरे, खा. संजीव नाईक, आ. संदिप नाईक, आ. कृपाशंकर सिंह या मान्यवरांसह हजारो माथाडी कामगार उपस्थित होते.

हिंदुगर्वगर्जना संपर्क यात्रेचा पहिला मेळावा संपन्न - नवी मुबई ऐरोली येथील लेवा पाटीदार हॉलमध्ये शिंदे गटाच्या हिंदुगर्वगर्जना संपर्क यात्रेचा पहिला मेळावा संपन्न झाला. नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले आयोजित या संपर्क यात्रा मेळाव्याला प्रमुख मागर्दशन करत असताना महाराष्ट्राचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल (Devendra Fadnavis political comments) केला.

बाळासाहेब ठाकरे हे केवळ तुमचे वडील नव्हते, तर ते आम्हा सगळ्या शिवसैनिकांचे बाप होते असे ठणकावत माझ्या बापाचा फोटो काढून मग राजकारण करा या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्तानचे बाप आहेत, उद्धव साहेब तुम्ही त्यांचा फोटो हटवाल का असा सवालही भुसे यांनी केला. आपल्या भाषणा दरम्यान भुसे यांनी अनेक लोकोपयोगी कामांचा उल्लेख करत एकनाथ शिंदें सारखा व्यक्ती मुख्यमंत्री मिळणे महाराष्ट्रासाठी उज्वल भविष्याची नांदी असल्याचे म्हटले. ऐरोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारले जाणार असल्याची घोषणाही भुसे यांनी यावेळी केली.

शिवसेनेची वाट राऊतांनी लावली - शिंदे गट उपनेत्या संध्या वढावकर यांनी आपल्या भाषणातून खासदार विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका करतांना अर्ध्या अधिक शिवसेनेची वाट राऊत यांनी लावल्याचे म्हटले. मी पात्र असताना आणि वारंवार मागून देखील मला उपनेते पद दिलं नाही. या उलट ज्यांनी कायम बाळासाहेबांवर अर्वांच्य भाषेत खालच्या भाषेत टीका केली. उद्धव साहेबांनी त्यांना उपनेते पद दिले, असे म्हणत त्यांनी आपली खंत व्यक्त केली. उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठीचा हा उठाव असून शिंदे साहेब या उठावाचे नेतृत्व करत असल्याचे म्हणत मंत्रालयावर पुन्हा भगवा फडकवायचा असल्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच या मेळाव्याचे आयोजक विजय विजय चौगुले यांनी आम्ही गद्दार नाही खरे गद्दार तुम्ही आहात. असा टोला हाणत काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती कोणी केली ? आम्ही तर शिंदे साहेबांनी भाजपबरोबर युती केलेल्या खऱ्या शिवसेनेत आहोत.

नवी मुंबईत भगवा बळकट करणार - नवी मुंबईत मी भगवा बळकट करणार आहे. शिंदे साहेबांच्या पाठीशी सदैव राहीन, अशी ग्वाही यावेळी चौगुले यांनी दिली. या मेळाव्यादरम्यान दहीहंडी उत्सवादरम्यान वरच्या थरावरून पडून मृत्यू झालेल्या शिव शंभू गोविंदा पथकातील संदेश दळवी ह्यांस भावपूर्ण श्रद्धांजली वाहत दादा भुसे यांच्या हस्ते संदेशच्या कुटुंबियांना एक लाख रुपयाची मदत करण्यात आली. शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास उपनेते विजय नाहाटा, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, यांच्यासह नवी मुंबईतील शिवसेनेच्या 38 नगरसेकांपैकी शिंदे गटात प्रवेश केलेल्या 30 नगरसेवकांमधील अनेक नगरसेवकांनी हजेरी लावली. 20 ते 30 तारखेदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभर हिंदुगर्वगर्जना संपर्क यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Last Updated : Sep 25, 2022, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.